गोव्याच्या आकांक्षाचा अमेरिकेत ‘विजयी’ धमाका

महिलांच्या व्यावसायिक स्क्वॉशमध्ये गोव्याच्या आकांक्षाचा पहिले यश; ग्वाटेमालात विजेती
Akanksha Salunkhe
Akanksha Salunkhedainikgomantak
Published on
Updated on

पणजी : अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित गोव्याच्या आकांक्षा साळुंखे हिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांच्या व्यावसायिक स्क्वॉशमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. तिने ग्वाटेमाला खुल्या पीएसए खुल्या स्क्वॉश स्पर्धेत बाजी मारली. (Goa's Akanksha Salunkhe won in women's professional squash)

मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला सिटी येथे 2 ते 5 मार्च या कालावधीत झालेल्या स्पर्धेत 23 वर्षीय आकांक्षाने अंतिम लढतीत कोलंबियाच्या द्वितीय मानांकित लॉरा टोव्हर हिच्यावर 3-2 (10-12, 11-2, 11-8, 6-11, 11-5) फरकाने मात करून कारकिर्दीतील पहिले व्यावसायिक अजिंक्यपद मिळविले. त्यापूर्वी तिने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाची (Australia) अॅलेक्स हेडन हिला 3-0 (11-9, 11-6, 11-6) असे, तर उपांत्यपूर्व फेरीत ग्वाटेमालाच्या विनिफर बोनिला हिला 3-0 (11-6, 11-2, 11-3) असे नमविले. जागतिक क्रमवारीत 157 व्या स्थानी असलेल्या आकांक्षाला स्पर्धेत तिसरे मानांकन होते.

Akanksha Salunkhe
रोहित शर्माने केले रवींद्र जडेजाचे कौतुक; फलंदाजी-बॉलिंग नाही तर...

100 गुणांचा लाभ

ग्वाटेमालातील स्पर्धा पीएसए चॅलेंजर टूर 5 सीरिज दर्जाची स्पर्धा होती. ग्वाटेमाला सिटीत पहिले व्यावसायिक विजेतेपद पटकाविल्यामुळे आकांक्षाला जागतिक मानांकनात 100 गुणांचा लाभ झाला असून ती आता 146 व्या क्रमांकापर्यंत प्रगती साधेल. विजेतेपदामुळे तिने 1,150 अमेरिकन डॉलर्स (Dollars) कमाईही केली, अशी माहिती तिचे वडील कमांडर हेमंत साळुंखे यांनी दिली.

Akanksha Salunkhe
गोव्याची पुन्हा कचखाऊ फलंदाजी; सलग दुसरा पराभव

आत्मविश्वास बळावला

कारकिर्दीतील पहिल्या व्यावसायिक विजेतेपदामुळे आत्मविश्वास बळावल्याची प्रतिक्रिया आकांक्षाने दिली. भविष्यात आणखी व्यावसायिक स्पर्धा खेळून मानांकन उंचावण्याची तिची मनीषा आहे. तुलनेत उच्च मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळण्यासाठी ती इच्छुक आहे, जेणेकरून कामगिरीचा आलेख उंचावेल, असे तिला वाटते. भारतातील स्क्वॉश निवड चाचणीत भाग घेऊन यावर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा, तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे ध्येय आहे.

अमेरिकेत शिक्षण

भारतात विद्यालयीन शिक्षण घेत असताना आकांक्षाने ज्युनियर-सीनियर आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत (international squash tournament) देशाचे प्रतिनिधित्व केले. नंतर स्क्वॉश शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत तिला अमेरिकेतील (United States) हार्टफोर्ड येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. मे 2021 मध्ये राज्यशास्त्र आणि मानवी हक्क हा विषय घेऊन तिने शिक्षण पूर्ण केले. आता तिने व्यावसायिक स्क्वॉशमध्ये कारकीर्द करण्याचे निश्चित केले असून न्यूयॉर्कमधील स्क्वॉश क्लबशी करार केला आहे. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये राहत असून तेथेच सराव करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com