RFD League Football Competition Dainik Gomantak
क्रीडा

RFD लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाला तिसऱ्या स्थानाची संधी

RFD League Football Competition : मोहिमेच्या अखेरीस आज यंग चँप्सविरुद्ध लढत

किशोर पेटकर

पणजी : बंगळूर एफसी व केरळा ब्लास्टर्स संघाचे रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिले दोन क्रमांक निश्चित आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यात चढाओढ आहे. त्यादृष्टीने गोव्यातील संघासाठी बुधवारचा (ता. 11) सामना महत्त्वाचा असेल. (RFD League Football Competition)

एफसी गोवाच्या स्पर्धेतील मोहिमेची समाप्ती बुधवारी आरएफ यंग चँप्स संघाविरुद्ध होईल. आणखी एका सामन्यात चेन्नईयीन एफसीसमोर मुंबई सिटीचे आव्हान असेल. गुरुवारी (ता. 12) स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी जमशेदपूर व हैदराबाद एफसी यांच्यात, तर बंगळूर आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात लढत होईल.

बंगळूर व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना विजेतेपदाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. हे दोन्ही संघ इंग्लंडमधील नेक्स्ट जन कप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बंगळूरचे 18, तर केरळा ब्लास्टर्सचे 15 गुण आहेत. हैदराबाद व एफसी गोवाचे प्रत्येकी 10 गुण आहेत. सरस गोलसरासरीमुळे हैदराबाद (+4) तिसऱ्या, तर एफसी गोवा (-1) चौथ्या स्थानी आहे. आरएफ यंग चँप्स व जमशेदपूर एफसी संघाचे प्रत्येकी सात गुण, चेन्नईयीन एफसीचे दोन गुण आहेत. तळाच्या मुंबई सिटीस सहाही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

SCROLL FOR NEXT