FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवा संघाची स्पॅनिश पसंती कायम

नवे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली 33 वर्षी एदू बेदिया एफसी गोवातर्फे 2022-23 मध्ये सलग सहावा आयएसएल मोसम खेळेल.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी फुटबॉल मोसमासाठी एफसी गोवाची स्पॅनिश खेळाडूंनाच पसंती राहणार आहे. त्यांनी अनुभवी एदू बेदियाला संघात कायम राखले असून बाकी परदेशी खेळाडूंत स्पेनमधील फुटबॉलपटूंना प्राधान्य असेल. नवे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली 33 वर्षी एदू बेदिया एफसी गोवातर्फे 2022-23 मध्ये सलग सहावा आयएसएल मोसम खेळेल.

(FC Goa team's Spanish preference maintained)

गतमोसमात करारबद्ध असलेल्या बाकी पाच परदेशी खेळाडूंना एफसी गोवाने मुक्त केले आहे. मागील वेळेसह एकूण सहा परदेशींत पाच खेळाडू स्पॅनिश होते.

गतमोसमात केरळा ब्लास्टर्सतर्फे आयएसएल स्पर्धेत खेळलेला स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ एफसी गोवातर्फे खेळणार हे उघड असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. याशिवाय प्रशिक्षक पेनया यांनी नव्या मोसमासाठी 29 वर्षीय मध्यरक्षक इकेर ग्वारोत्शेना व 35 वर्षीय बचावपटू मार्क व्हालेंते या स्पॅनिश फुटबॉलपटूंची नावे संघ व्यवस्थापनास सुचविल्याची माहिती आहे. यासंदर्भात ऑनलाईन बैठकही झाली आहे. दोन्ही नव्या खेळाडूंच्या कराराची अधिकृत घोषणा संघातर्फे केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT