FC Goa stopped Hyderabad

 

Dainik Gomantak

क्रीडा

एफसी गोवाने हैदराबादला रोखले

आयएसएल फुटबॉल: रंगतदार लढतीत दोन्ही संघांचा उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल

दैनिक गोमन्तक

पणजी: जोरदार प्रतिहल्ल्याने रंगतदार ठरलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) लढतीत एफसी गोवाने (Goa) हैदराबाद एफसीला 1-1 गोलबरोबरीत रोखले. सामना शनिवारी रात्री बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला. ऑस्ट्रेलियन जोएल चिएनेज याने 54व्या मिनिटास हैदराबादचे खाते उघडल्यानंतर स्पॅनिश आघाडीपटू ऐरान काब्रेरा याने 62व्या मिनिटास एफसी गोवास बरोबरी साधून दिली. बरोबरीच्या एका गुणासह हैदराबादने दुसऱ्या स्थानापर्यंत प्रगती साधली. जमशेदपूर व चेन्नईयीन एफसी यांच्याइतकेच 11 गुण झाल्यानंतर हैदराबादची गोलसरासरी सरस ठरली. त्यांची सहा सामन्यातील दुसरी बरोबरी आहे. लागोपाठ दोन सामने जिंकलेल्या एफसी गोवाने स्पर्धेत पहिली बरोबरी नोंदविली. सहा सामन्यांतून त्यांचे सात गुण झाले. नॉर्थईस्ट युनायटेडचेही तेवढेच गुण आहेत, पण गोव्यातील संघाने गोलसरासरीत सातवा क्रमांक मिळविला.

उत्तरार्धात गोलबरोबरी

विश्रांतीनंतरच्या नवव्या मिनिटास हैदराबादने एफसी गोवाच्या क्षेत्रात मुसंडी मारली. निखिल पुजारी चेंडूसह उजव्या बाजूने खोलवर गेला आणि त्याने शानदार क्रॉसपास केला. यावेळी अगदी नेटसमोरून चिएनेज याने उडी घेत अप्रतिम हेडिंग साधले. मात्र हैदराबादचा आनंद आठच मिनिटे टिकला. एफसी गोवाच्या देवेंद्र मुरगावकरने हैदराबादच्या गोलक्षेत्रात धडक मारत फटका साधला, पण चेंडू गोलपोस्टला आपटून माघारी फिरला. यावेळी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने जागा सोडलेली असता रिबाऊंडवर काब्रेरा याने अचूक नेम साधला आणि दुखापतीनंतर संघातील पुनरागमन सफल ठरविले.

अंतिम टप्प्यात चुरस

सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग चेंडू व्यवस्थित रोखू शकला नाही. याक्षणी हैदराबादच्या हावियर सिव्हेरियो याचा फटका एफसी गोवाच्या बचावपटूस आपटला आणि हैदराबादचा ॲरेन डिसिल्वा ऑफसाईड ठरल्यामुळे संधी वाया गेली. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना एफसी गोवाच्या आल्बेर्टो नोगेराने चेंडूला योग्य दिशा दाखविणारा फटका मारला, मात्र हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने जबरदस्त चापल्य प्रदर्शित करत संघावरील संकट ऐनवेळी टाळले. त्यामुळे गोलबरोबरी कायम राहिली.

दृष्टिक्षेपात...

- हैदराबादच्या जोएल चिएनेज याचा यंदा 6 सामन्यात 1 गोल, एकूण 18 सामन्यांत 4 गोल

- एफसी गोवातर्फे पहिलाच मोसम खेळणाऱ्या ऐरान काब्रेराचे 3 लढतीत 2 गोल

- आतापर्यंत स्पर्धेत हैदराबादचे 11, तर एफसी गोवाचे 9 गोल

- सामन्यात एकूण 8 जणांन यलो कार्ड, हैदराबादचे 5, एफसी गोवाचे 3 खेळाडू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT