FC Goa signs spanish player Iker Guarrotxen Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाच्या आक्रमणात आणखी एक स्पॅनिश

इकेर ग्वार्रोचेना याच्याशी दोन वर्षांचा करार, स्पेनमधील तृतीय विभागीय स्पर्धेत चमक

किशोर पेटकर

पणजी : एफसी गोवाने आक्रमण आणखी धारदार करण्याच्या उद्देशाने स्पॅनिश फुटबॉलपटू इकेर ग्वार्रोचेना याला करारबद्ध केले असून दोन वर्षांसाठी तो या संघात असेल. स्पेनमधील तृतीय विभागीय स्पर्धेत चमकदार खेळ केलेला 29 वर्षीय ‘विंगर-फॉरवर्ड’ 2024 मधील मोसम संपेपर्यंत खेळणार आहे.

इकेर ग्वार्रोचेना याच्या कराराची माहिती शुक्रवारी एफसी गोवातर्फे देण्यात आली. त्यांनी यापूर्वीच स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याच्याशी करार केले आहेत. ग्वार्रोचेना गतमोसमात स्पेनमधील तृतीय विभागीय स्पर्धेत यूडी लोग्रोनेज संघातर्फे खेळला होता व त्याने एकवेळ हॅटट्रिक नोंदवत 14 गोल केले होते. त्या लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत त्याचा चौथा क्रमांक होता. याशिवाय ग्वार्रोचेना याने तीन असिस्टचीही नोंद केली. त्याच्या शानदार कामगिरीमुळे लोग्रोनेज संघाला प्ले-ऑफसाठी पात्रता मिळाली होती.

‘‘एफसी गोवात सहभाग असणे ही सन्मानाची बाब आहे. मोजक्या निवडक परदेशी खेळाडूंत असणे अभिमानास्पद आहे. एफसी गोवाने माझ्यावर विश्वास दाखविला. त्या कारणास्तव त्यांना नव्या उंचीवर नेण्याच्यासाठी मी सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करेन,’’ असे ग्वार्रोचेना याने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी संघाची ध्येयधोरणे समजावून सांगितल्यानंतर प्रशिक्षक कार्लोस पेनया यांच्याशी बोलून आपण करार स्वीकारल्याचे त्याने नमूद केले. स्पेनव्यतिरिक्त इतर देशातील क्लबकडूनही विचारणा झाली होती, पण काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने आपण एफसी गोवात दाखल होण्याचे ठरविले, असेही त्याने स्पष्ट केले.

अष्टपैलू, सर्जनशील खेळाडू

खेळाशी जोडलेल्या सर्जनशील खेळाडूच्या शोधात आम्ही होतो. त्याच्यामुळे संघात भरपूर गुणवत्ता आणि अष्टपैलूत्व येत आहे, तो वेगवेगळ्या जागी चांगल्या प्रकारे खेळू शकतो. आमच्या संघाला आवश्यक असलेला तो खेळाडू असून एफसी गोवाच्या शैलीसाठी उपयुक्त आहे, असे रवी पुस्कुर यांनी ग्वार्रोचेना याच्याशी करार करण्याविषयी नमूद केले.

इकेर ग्वार्रोचेना याची कारकीर्द

  • उत्तर स्पेनमधील बिल्बाओ शहरात जन्म

  • युवा कारकिर्दीत ॲरेनाज गेशो व ॲथलेटिक बिल्बाओचे प्रतिनिधित्व

  • 2011 मध्ये स्पॅनिश चतुर्थ विभागीय सीडी बास्कोनिया संघाशी करार

  • ॲथलेटिक बिल्बाओ रिझर्व्ह, सीडी टेनेरिफे, सीडी मिरांडेज, कल्चरल लिओनेजा या संघातर्फे मैदानात

  • 2018 मध्ये पोलंडमधील अव्वल विभागीय संघ पोगोन क्षेसिन संघात दाखल

  • ग्रीसमध्ये व्होलोस एनपीएस, ऑस्ट्रेलियान लीगमध्ये वेस्टर्न युनायटेडतर्फे खेळल्यानंतर पुन्हा स्पेनमधील यूडी लोग्रोनेज संघात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT