गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या एफसी गोवा (FC Goa) आणि वास्को स्पोर्टस क्लब यांच्यातील सामन्याचा क्षण Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाने वास्कोला बरोबरीत रोखले

वास्को संघाचा अनुभवी गोलरक्षक लुईस बार्रेटोच्या दक्षतेमुळे एफसी गोवा (FC Goa) संघाची आक्रमणे अपयशी

Dainik Gomantak

Goa: एफसी गोवा (FC Goa) डेव्हलपमेंटल संघाने गोवा प्रोफेशनल लीग (Goa Pro League) फुटबॉल स्पर्धेतील (Football Tournament) अपराजित मालिका कायम राखताना शनिवारी वास्को स्पोर्टस क्लबला (Vasco Sports Club) गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

अनुभवी गोलरक्षक लुईस बार्रेटो याच्या दक्ष कामगिरीमुळे एफसी गोवा संघाच्या आक्रमणांना यश मिळाले नाही. त्यामुळे माजी विजेत्यांना बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

सामन्याच्या सुरवातीच्या अर्ध्या तासाच्या खेळात एफसी गोवाच्या ज्योवियल डायस व ब्रिसन फर्नांडिस यांनी वास्को क्लबच्या गोलक्षेत्रात धडक मारली होती, परंतु गोलरक्षक बार्रेटोस चकवा देणे त्यांना शक्य झाले नाही. ३६व्या मिनिटास बार्रेटोने डावीकडे झेपावत ज्योवियलचा आणखी एक प्रयत्न उधळून लावला. त्यामुळे पूर्वार्धाअखेरीस गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांच्या खेळात एफसी गोवाने गोलसाठी जोरदार आक्रमणे केली, परंतु लुईस बार्रेटोने एकाग्रता ढळू दिली नाही. डेल्टन कुलासो व ब्रिटो परेरा यांचे धोकादायक फटके रोखताना लुईसने सारा अनुभव पणास लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT