बोर्डे, डिचोली येथे बुधवारी 'होमकुंड' उत्सव, तयारी पूर्ण; वडेश्वर देवाच्या प्रांगणात भरणार उत्सव, व्रतस्थ भक्तगण करणार अग्निदिव्य

Borde Bicholim Homekund 2026: बोर्डे येथील शिगमोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून बुधवारी (ता. ४) प्रसिद्ध होमकुंड उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
Borde Bicholim Homekund 2026
Borde Bicholim Homekund 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: बोर्डे येथील शिगमोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून बुधवारी (ता. ४) प्रसिद्ध होमकुंड उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.

बुधवारी रात्री मोडासह श्रींचा कलश मंदिराबाहेर काढण्यात आल्यानंतर होमकुंड पेटविण्यात येणार आहे. नंतर वाजतगाजत देवीच्या कलश मिरवणुकीसह व्रतस्थ भक्तगण गावतड येथील पवित्र झरीवर जाऊन त्याठिकाणी स्नान करून पुनःश्च वाजतगाजत होमकुंडस्थळी येणार आहेत. माघारी येताना श्री सातेरी, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्री ब्राह्मण, श्री वडेश्वर आदी देवतांचा भोवमान करण्यात येणार आहे.

Borde Bicholim Homekund 2026
Goa Politics: 'आप’च्‍या 'ऑफर'वर अद्याप आपण विचारच केलेला नाही! नावेलीतून वालंका निवडणूक लढविणारच - चर्चिल आलेमाव

होमकुंड स्थळी आल्यानंतर मध्यरात्री पारंपरिक कार्यक्रमांनुसार श्रींच्या कलशासहित व्रतस्थ भक्तगण "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आदी देवदेवतांचा जयघोष करीत रखरखत्या होमकुंडातून अग्निदिव्य करणार आहेत. तत्पूर्वी रात्री १०.३० वा. झरेबांबर-दोडामार्ग येथील नाईक दशावतारी पारंपरिक दशावतार नाट्यमंडळातर्फे ''पाप प्रकोप'' हा नाट्यप्रयोगही होणार आहे. भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

Borde Bicholim Homekund 2026
Goa Politics: खरी कुजबुज; भाजपावाले गोंयकार नाहीत?

गुरुवारी घोडेमोडणी

बोर्डे येथील शिगमोत्सवाचे आकर्षण असलेली प्रसिद्ध घोडेमोडणी गुरुवारी (ता. ५) साजरी करण्यात येणार आहे. सायंकाळी गावतड येथे घोडेस्वारांना सजविण्यात येणार आहेत.

कोराटीच्या मैदानावर घोडेस्वार आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने घोडेमोडणी साजरी करण्यात येणार आहे. बोर्डे येथील गडे उत्सव रविवारी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com