एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा मिझोरामवर दणदणीत विजय

गोव्याच्या महिला क्रिकेट संघाने गाठली बाद फेरी
Goa Women's Cricket Captain Shikha Pandey
Goa Women's Cricket Captain Shikha PandeyDainik Gomantak

Goa: कर्णधार शिखा पांडेच्या (Shikha Pandey) भन्नाट गोलंदाजीच्या बळावर गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट (Goa Women's Cricket) संघाने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अपेक्षेनुसार बाद फेरी गाठली. एलिट ड गटातील शेवटच्या साखळी लढतीत त्यांनी मिझोरामवर आठ विकेट राखून दणदणीत विजय प्राप्त केला.

विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर शनिवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना झाला. गोव्याचा हा पाच लढतीतील चौथा विजय ठरला. त्यांचे 16 गुण झाले. या गटातील आणखी एका सामन्यात मध्य प्रदेशने विदर्भास 13 धावांनी हरवून सलग पाचवा विजय नोंदविला. त्यांचे 20 गुण झाले. मध्य प्रदेश व गोवा एलिट ड गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरले. गटविजेते असल्याने मध्य प्रदेशला थेट उपांत्यपूर्व फेरीत, तर गटउपविजेते गोव्यास उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले. ही फेरी 13 नोव्हेंबरपासून बंगळूर येथे खेळली जाईल.

Goa Women's Cricket Captain Shikha Pandey
पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान डिसेंबरमध्ये गोव्यात उतरणार

शिखाचा धारदार मारा

भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने शनिवारी मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. मिझोरामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. 19व्या षटकात त्यांची स्थिती तुलनेत चांगली होती, मात्र नंतर 18 धावांत 8 विकेट गमावल्यामुळे मिझोरामचा डाव 38.1 षटकांत 58 धावांत संपुष्टात आला. शिखाने 8 षटकांत फक्त 6 धावा देताना 4 विकेट मिळविल्या. याशिवाय सुनंदा येत्रेकर व रूपाली चव्हाण या अनुभवी फिरकीद्वयीने प्रत्येकी 2 गडी बाद करताना शानदार मारा केला.

पंधराव्या षटकात विजय

पूर्वजा वेर्लेकर (नाबाद 25), श्रेया परब (11), निकिता मळीक (नाबाद 17) यांच्या चमकदार फलंदाजीमुळे गोव्याने 14.3 षटकांत 2 विकेट गमावून विजयाची औपचारिकता पूर्ण करताना 62 धावा केल्या. गोव्याने स्पर्धेत अनुक्रमे विदर्भ, हरियाना, गुजरात व मिझोरामवर मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे समीकरण बदललेल्या लढतीत त्यांना मध्य प्रदेशकडून हार पत्करावी लागली.

Goa Women's Cricket Captain Shikha Pandey
पत्नीचा खून करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त

संक्षिप्त धावफलक

मिझोराम : 38.1 षटकांत सर्वबाद 58 (श्वेता 22, तरंग झा 17, शिखा पांडे 8-4-6-4, निकिता मळीक 7-1-18-1, सोनाली गवंडर 2-1-9-0, पूर्वा भाईडकर 5-2-7-1, सुनंदा येत्रेकर 8-1-14-2, रूपाली चव्हाण 7.1-3-4-2, तेजस्विनी दुर्गद 1-1-0-0) पराभूत वि. गोवा : 14.3 षटकांत 2 बाद 62 (पूर्वजा वेर्लेकर नाबाद 25, श्रेया परब 11, तेजस्विनी दुर्गद 4, निकिता मळीक नाबाद 17, तरंग झा 1-13, पुईपुली 1-18).

एलिट गटातील सर्वोत्तम कामगिरी

गोव्याने डिसेंबर २017 मध्ये प्लेट गट स्पर्धा जिंकून एलिट गटासाठी पात्रता मिळविली होती. यंदा एलिटमधील चौथ्या मोसमात गोव्याने सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना बाद फेरी गाठण्याचा पराक्रम साधला. मागील तीन मोसमातील 21 सामन्यांत 7 सामने जिंकणाऱ्या गोव्याने यंदा 5 लढतीत 4 विजय नोंदविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com