Goa Shigmotsav: पणजीत शिमगोत्सवाचा जल्लोष; शनिवारी बांदोडकर मार्गावरून निघणार रोमटामेळ, चित्ररथ मिरवणूक

Panaji Shigmotsav 2026 schedule: राजधानी पणजीत मंगळवार, ३ ते रविवार, ८ मार्चपर्यंत शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Goa Shigmotsav
Goa ShigmotsavDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीत मंगळवार, ३ ते रविवार, ८ मार्चपर्यंत शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ रोजी रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य पथके, वेशभूषा केलेले कलाकार यांची भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वा. जुन्या सचिवालयाकडून निघणार आहे. ही मिरवणूक दयानंद बांदोडकर मार्गावरून पुढे कांपालपर्यंत जाणार आहे. नागरिकांनी सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी केले.

समितीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीनिवास धेंपे बोलत होते. यावेळी समितीचे कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक व कार्यकारी सदस्य किशोर नार्वेकर उपस्थित होते.

शिमगोत्सव समिती, सरकार आणि इतर दात्यांकडून मिळून सुमारे १० लाख ५७ हजारांहून अधिक रकमेची पारितोषिके विविध स्पर्धांसाठी ठेवण्यात आली असल्याचे धेंपे यांनी सांगितले.

Goa Shigmotsav
Goa Politics: 'आप’च्‍या 'ऑफर'वर अद्याप आपण विचारच केलेला नाही! नावेलीतून वालंका निवडणूक लढविणारच - चर्चिल आलेमाव

पणजीतील अंतर्गत रस्त्यांवरून होणाऱ्या मिरवणुकासाठी रस्त्यावरील फुटपाथवर पेंडाल उभारणे कठीण होत आहे, जागाही अडचणीची आहे, त्यासोबतच या रस्त्यावर लोकवस्ती असल्याने रात्री उशिरा मिरवणुकीचा ज्येष्ठांना त्रास होत असल्याने यंदापासून कार्निव्हल मार्गावरून म्हणजेच जुन्या सचिवालयाकडून कांपालपर्यंत शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शांताराम नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, आझाद मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर ८ मार्चपर्यंत रोज सायं. ७ वा. विविध कार्यक्रमांची मेजवानी असेल. ३ रोजी ओंकार मेलोडिज वाद्यवृंद यांचा हिंदी सिनेगीतांचा कार्यक्रम सादर होईल. ४ रोजी कला चेतना वळवई निर्मित ‘यो घर तुमचेच’ हा कोकणी विनोदी नाट्यप्रयोग सादर होईल.

Goa Shigmotsav
Goa Bomb Threat: मोठी बातमी! पणजीतील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची धावपळ अन् परिसरात भीतीचे वातावरण

५ रोजी सिद्धकला डान्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘जल्लोष’ हा विविधरंगी नृत्यांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. ६ मार्च रोजी निषाद क्रिएशन निर्मित ‘सूरसंगम’ या कार्यक्रमात मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, नाट्यगीते, युगुलगीते, कोळीगीते सादर केली जातील. ८ मार्च रोजी सोलापूर येथील भाग्यश्री प्रॉडक्शनचा ‘लावण्यखणी’ हा लावणी नृत्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

संकेतस्थळाचे लोकार्पण

पणजी शिमगोत्सव समितीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण श्रीनिवास धेंपे यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, मागील ३७ वर्षे शिमगोत्सव एकोप्याने साजरा करत आहोत. ही एकमेव शिमगोत्सव समिती आहे जिचे स्वतंत्र कार्यालय आहे. पणजीतील शिमगोत्सव कार्यक्रमामुळे स्थानिकांसोबतच पर्यटकांना गोव्याच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन यानिमित्ताने घडत आहे.

पथकांना अर्ज करण्याचे आवाहन

पर्यटन खात्याच्या आदेशानुसार बुधवार, ४ रोजी सकाळी १० ते दु. १ वा.पर्यंत रोमटामेळ पथकांनी अर्ज घेऊन जावेत. चित्ररथ व इतर स्पर्धांसाठी शुक्रवार, ६ रोजीपर्यंत अर्ज दिले जातील. रोमटामेळ पथकांचा सादरीकरणाचा क्रम चिठ्ठीद्वारे ठरवण्यात येईल. अचानक आलेल्या पथकांना सहभागी होता येणार नाही. मिरवणूक वेळेत आणि नियोजित पद्धतीने व्हावी यासाठी हे नियम करण्यात आले असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शांताराम नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com