Fc Goa Head Coach Carlos Pena  Dainik Gomanta
क्रीडा

ISL Football 2022-23 : एफसी गोवा संघाची नजर ‘प्ले-ऑफ’वर

प्रशिक्षक पेनया आशावादी: एटीके मोहन बागानविरुद्ध कोलकात्यात लढत

दैनिक गोमन्तक डिजिटल

एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीवर नजर एकवटली असल्याची माहिती सोमवारी मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी दिली. एटीके मोहन बागानविरुद्धच्या आगामी लढतीसंदर्भात ते बोलत होते.

एटीके मोहन बागानविरुद्ध एफसी गोवा बुधवारी (ता. 28) कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळेल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 20नोव्हेंबरला एफसी गोवाने याच प्रतिस्पर्ध्यांना 3-0 फरकाने सहजपणे हरविले होते. ‘‘मला पूर्णतः वेगळ्या लढतीची अपेक्षा आहे. दोन्ही संघांची ताकद समान आहे. गुणतक्त्यांत मोठा फरक नाही आणि दोन्ही संघ प्ले-ऑफ फेरीसाठी झगडत आहेत,’’ असे पेनया म्हणाले. एटीके मोहन बागानविरुद्धच्या व्यूहरचनेविषयी एफसी गोवाचे प्रशिक्षक म्हणाले, की ‘‘आम्हाला बचावात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि प्रत्येक वेळी आक्रमण करताना त्यांना शिक्षा होईल यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील.’’

‘त्या’ सामन्यातील कामगिरी सर्वोत्तम

घरच्या मैदानावर एफसी गोवाने एटीके मोहन बागानला सहजपणे हरविले होते. त्या सामन्यात आपल्या संघाने बजावलेली कामगिरी मोसमातील सर्वोत्तम होती, असे पेनया यांनी नमूद केले. ‘‘त्यांच्याविरुद्ध त्या लढतीत आम्ही खूप ऊर्जा वापरली आणि सारे लक्ष एकाग्र केले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने आशावादी आहोत,’’ असे स्पॅनिश प्रशिक्षक कोलकात्यातील लढतीविषयी म्हणाले.

प्रतिकुल परिस्थितीत सात गुण

सामना घरच्या मैदानावर असो, वा बाहेरगावी. पूर्ण तीन गुणांची प्राप्ती हेच प्रत्येक लढत खेळताना समान ध्येय असते, याचा पुनरुच्चार पेनया यांनी केला. मागील तीन सामन्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघाने सात गुणांची कमाई केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एफसी गोवा संघ सलग तीन सामने अपराजित आहे. त्यांनी घरच्या मैदानावर फातोर्ड्यात ओडिशाला 3-0 असे, नॉर्थईस्ट युनायटेडला 2-1 असे नमविले, तर जमशेदपूरविरुद्ध पिछाडीवरून 2-2 अशी गोलबरोबरी साधली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT