FC Goa  Dainik Gomantak
क्रीडा

Goa Police Cup स्पर्धेत एफसी गोवा उपांत्यपूर्व फेरीत दाखल

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना दहा खेळाडूंसह खेळलेल्या यूथ क्लब मनोरा संघावर 3-1 फरकाने विजय मिळविला.

दैनिक गोमन्तक

पणजी : गतविजेत्या एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाने 17 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेच्या (Goa Police Cup Tournament) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना दहा खेळाडूंसह खेळलेल्या यूथ क्लब मनोरा संघावर 3-1 फरकाने विजय मिळविला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर (Dhuler Stadium) झाला.

सामन्याच्या पूर्वार्धात एफसी गोवा संघ 2-1 फरकाने आघाडीवर होता. त्यांच्यासाठी वासीम इनामदार याने 7 व्या, एचपी लालरेमरुआता याने 16 व्या, तर साल्जेओ डायस याने 85 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. मनोरा संघाची पिछाडी बदली खेळाडू डेन्विल फर्नांडिसने 45+1 व्या मिनिटास कमी केली. एफसी गोवाने दोन गोलची आघाडी घेतल्यानंतर मनोरा संघाचा गोलरक्षक महंमद तारीक संयम गमावून बसला, त्यामुळे त्याला थेट रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. त्यामुळे बाकी कालावधीत मनोरा संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत 13 नोव्हेंबर रोजी एफसी गोवा आणि सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात सामना होईल.

वास्कोचा साळगावकर संघास धक्का

स्पर्धेतील आणखी एका सामन्यात वास्को स्पोर्टस क्लबने माजी विजेत्या साळगावकर एफसीला 2-1 फरकाने पराभवाचा धक्का दिला. सामना मडगाव येथील चौगुले मैदानावर झाला. या विजयासह वास्को क्लबने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. वास्को क्लबने पूर्वार्धात दोन गोलची आघाडी प्राप्त केली. 15 व्या मिनिटास चिराग म्हार्दोळकर याने, तर 30 व्या मिनिटास फ्रान्सिस फर्नांडिस याने प्रत्येकी एक गोल नोंदविला. 90+2 व्या मिनिटास सिडनी गावकर याने साळगावकर संघाची पिछाडी एका गोलने कमी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT