Goa FC Player Iker Guarrotxena Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एफसी गोवाचे विजयी `होमकमिंग`

इंडियन सुपर लीग स्पर्धेत जमशेदपूरवर 3-0 गोलफरकाने दणदणीत विजय

गोमन्तक डिजिटल टीम

(ISL Football) पणजी: एफसी गोवा संघाने घरच्या मैदानावर विजयी पुनरागमन करताना गुरुवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शानदार कामगिरी बजावली. मोठ्या संख्येने आलेल्या पाठीराख्यांना जल्लोषाची संधी देताना त्यांनी गतमोसमातील लीग शिल्ड विजेत्या जमशेदपूर एफसीवर 3-0 फरकाने मात केली. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

तब्बल 972 दिवसानंतर पाठीराख्याच्या साक्षीने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने चाहत्यांना निराश केले नाही. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास स्पॅनिश खेळाडू इकेर ग्वार्रोचेना याने एफसी गोवाचे गोलखाते उघडले. 12 व्या मिनिटास मोरोक्कन नोआ सदावी याने यजमान संघाची आघाडी वाढविली. त्यानंतर 90+3 व्या मिनिटास बदली खेळाडू ब्रायसन फर्नांडिसने एफसी गोवाच्या धडाकेबाज विजयावर शिक्कामोर्तब केले.

एफसी गोवाचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता नऊ गुण झाले आहेत. गोलसरासरीवर ओडिशा एफसीला मागे टाकत गोव्यातील संघाने दुसरा क्रमांक पटकावला. पहिल्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीपेक्षा त्यांचा एक गुण कमी आहे. जमशेदपूरला दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. चार सामन्यानंतर चार गुणांसह त्यांची आठव्या क्रमांकावर घसरण झाली. एफसी गोवा आता पुढील सामन्यासाठी कोची येथे जाणार आहे. तेथे 13 नोव्हेंबर रोजी त्यांचा केरळा ब्लास्टर्सविरुद्ध सामना होईल. जमशेदपूर एफसी नऊ नोव्हेंबरला हैदराबाद एफसीविरुद्ध घरच्या मैदानावर खेळेल.

सुरवातीस धडाका

सामन्याच्या दुसऱ्या मिनिटास कर्णधार ब्रँडन फर्नांडिस व एदू बेदिया यांच्या सुरेख शानदार चालीवर ग्वार्रोचेना याने पहिला आयएसएल गोल केला. नोआ सदावी याने मोसमातील दुसरा गोल नोंदविताना ब्रँडनच्या असिस्टवर डाव्या पायाच्या फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक टीपी रेहेनेश याला चकविले. त्यानंतर लगेच फारेस अरनौट याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा ग्लॅन मार्टिन्सने घेतली, मात्र या बदलाचा एफसी गोवाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. निर्धारित वेळेतील पाच मिनिटे बाकी असताना प्रशिक्षक पेनया यांनी ब्रँडनच्या जागी ब्रायसनला मैदानात धाडले. इंज्युरी टाईममध्ये 21 वर्षीय बदली खेळाडूने सीनियर संघातर्फे पहिल्या आयएसएल गोलचा मान मिळविला. त्याने सावियर गामा याच्या असिस्टवर संघाची आघाडी आणखीन मजबूत केली.

धीरजचे क्लीन शीट पुनरागमन

जमशेदपूरविरुद्ध दुखापतीनंतर तंदुरुस्त झालेला एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याने डोक्यावर शिरस्त्राण वापरून पुनरागमन केले व त्याने सामन्यात एकही गोल स्वीकारला नाही. धीरजला चेन्नईयीनविरुद्ध दुखापत झाली होती.

दृष्टिक्षेपात एफसी गोवाचे वर्चस्व

- आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचा जमशेदपूरवर 11 लढतीत 6 विजय

- गतमोसमातील सलग 2 पराभवानंतर एफसी गोवा जमशेदपूरविरुद्ध विजयी

- इकेर ग्वार्रोचेना आणि ब्रायसन फर्नांडिस यांचा पहिल्यांदाच आयएसएल गोल

- नोआ सदावी याचे 4 लढतीत 2 गोल, एफसी गोवातर्फे यंदा अव्वल

- एफसी गोवाचे यंदा एकूण 7 गोल, 2 वेळा सामन्यात क्लीन शीट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT