Womens Football: रोझरी महाविद्यालयाने विजेतेपद राखले

गोवा विद्यापीठआंतरमहाविद्यालयीन स्पर्धा: झेवियर्सवर मात; अॅनिएला, जोसेला, जॉयरी, क्लेन्सीचे गोल
Rosary College Football Team
Rosary College Football Team Dainik Gomantak
Published on
Updated on

(Womens Football) पणजी : नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाने गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद राखले. गुरुवारी झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयावर 4-0 फरकाने मात केली.

Rosary College Football Team
Goa Land Conversion: जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार जमीन रूपांतरण प्रकरणे 20 दिवसांनी निकाली काढण्याचा अधिकार

अंतिम सामना ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाला. रोझरी महाविद्यालयाने सामन्यावर वर्चस्व राखले, पण संधी गमावल्यामुळे त्यांना आघाडीसाठी 41 व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. 41 व्या मिनिटास अॅनिएला बार्रेटो हिने संघाचे गोलखाते उघडले.

उत्तरार्धात रोझरी महाविद्यालयाने आणखी तीन गोल नोंदवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जोसेला मस्कारेन्हास हिने 47 व्या, जॉयरी फर्नांडिसने 53 व्या, तर क्लेन्सी मिरांडाने 83 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला.

Rosary College Football Team
Edvin Nunes Arrested: कोविडच्या बोगस प्रमाणपत्रप्रकरणी एडविन नुनीस याला अटक

गोवा विद्यापीठाचे उपकुलसचिव (वित्त) सत्यवान तळवडकर, सहाय्यक कुलसचिव (वित्त) मिलिंद शिवोलकर, गोवा फुटबॉल विकास मंडळाचे सदस्य कॉलिन वाझ, सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्रशासक फादर अंतोनियो सालेमा यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com