FC Goa Development Team Dainik Gomantak
क्रीडा

Goa Professional Football League : एफसी गोवा, चर्चिल ब्रदर्स विजयी

म्हापसा येथील धुळेर स्टेडियम व नागोवा येथील मैदानावर पार पडले सामने

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Professional Football League : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी एफसी गोवा डेव्हलपमेंट संघासह चर्चिल ब्रदर्सने विजयाच्या पूर्ण तीन गुणांची कमाई केली. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर एफसी गोवाने गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 4-1 फरकाने नमविले. नागोवा येथील मैदानावर झालेला सामनाही एकतर्फी ठरला. चर्चिल ब्रदर्सने वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबचा 5-1 फरकाने धुव्वा उडविला.

एफसी गोवा संघाला फ्रांग्की बुआम याने दहाव्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. 53व्या मिनिटास ज्योएल बारेट्टोने गार्डियन एंजलला बरोबरी साधून दिली. नंतर माल्सॉमत्लुआंगा याने 73व्या, मुहम्मद नेमिल याने 85व्या, तर बदली खेळाडू लीवन कास्तान्हा याने 90+5व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदवून एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

चर्चिल ब्रदर्सच्या विजयात जॉर्ज डिसोझा याने 16व्या, अॅरोन बारेट्टोने 22व्या, शुबर्ट परेराने 26व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला पूर्वार्धात 3-0 अशी आघाडी मिळाली. 50 मिनिटास अॅरोन बारेट्टोने आणखी एक गोल केला. नंतर ज्योबर्न कार्दोझने 53व्या मिनिटास आघाडी 5-0 अशी एकतर्फी केली. 68व्या मिनिटास म्यूटन फर्नांडिसने वेळसाव संघाची पिछाडी एका गोलने कमी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT