Video Viral: क्रिकेटच्या देवाचा साधेपणा पुन्हा चर्चेत! चुलीवरच्या जेवणावर मारला ताव

सचिन तेंडुलकरने चुलीवरील जेवणाचा आस्वाद घेतला आहे.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak

Sachin Tendulkar: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेऊन आता जवळपास 9 वर्षे उलटून गेली आहेत. असे असले तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. तो त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करत असतो, ज्यामुळे तो अनेकदा चर्चेतही येत असतो.

नुकताच तो त्याच्या एका व्हिडिओमुळे खूप चर्चेत आला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो चुलीवरील जेवणाचा आस्वाद घेत आहे. त्याच्या व्हिडिओत दिसते की राजस्थानमध्ये चुलीवर दोन महिला जेवण बनवत आहेत. त्यावेळी सचिन त्यांच्याशी गप्पा मारतो.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Video: मास्टर ब्लास्टर घेतोय या कलेचं ट्रेनिंग, रिव्हर्स स्विंगशीही केली तुलना

तो त्यांना म्हणतो की 'चुलीवरील जेवणाचा स्वाद वेगळात असतो.' तसेच त्या महिलांनी हे देखील सांगितले की त्या गहू आणि बाजरीच्या भाकरी करत आहेत. सचिन त्यांना असेही म्हणाला की 'जेवण मी पण बनवतो, पण मला रोटी गोल बनवता नाही येत.'

त्याचबरोबर सचिन जेव्हा समोर असलेले तुप पाहातो आणि ते चाखतो. त्यावेळी तो त्यांना असेही म्हणतो की एवढे तुप मी माझ्या आयुष्यात कधीही खाल्ले नसेल. पण हे प्रेमाने भरलेले तुप आहे.'

सचिनने काही दिवसांपूर्वी कयाकिंग शिकतानाचा व्हिडिओही शेअर केला होता. तेसच त्याने काहीदिवसांपूर्वीच लहानमुलांबरोबर नाताळाचेही सेलिब्रेशन केले होते.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव असेही संबोधले जाते. त्याच्या नावावर अनेक मोठमोठे विश्वविक्रमही आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकेही केली आहेत.

त्याने त्याच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळले असून 15921 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 463 वनडेत 18426 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1 सामना खेळला असून 10 धावा केल्या आहेत. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 201 विकेट्सही घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com