MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni in IPL 2023: बापरे! धोनीच्या घोषणेच्या आवाजाने विमानालाही टाकलंय मागे, चकीत करणारा डेटा आला समोर

आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नावाने चाहते घोषणा देत असतानाच्या आवाजाच्या डेसिबल लेव्हलचा डेटा समोर आला आहे.

Pranali Kodre

Fans recorded the loudest MS Dhoni Chants: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा गेल्या दोन महिने सुरू होती. या स्पर्धेत तब्बल 74 सामने खेळवण्यात आले. 31 मार्चपासून सुरू झालेल्या या हंगामाचा आता सोमवारी अंतिम सामना होणार आहे.

या संपूर्ण हंगामात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. कधी फलंदाजांचे, कधी गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले. कधी अगदी अखेरच्या चेंडूवर निकाल लागलेले पाहायला मिळाले. तरी या हंगामात खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच सर्वाधिक चर्चा झाली ती चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या चाहत्यांची.

सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरू आहे की आयपीएल 2023 हा धोनीचा कारकिर्दीतील अखेरचा हंगाम आहे. त्यामुळे या हंगामात धोनीला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. केवळ चेन्नईचे घरचे मैदान एमए चिदंबरम स्टेडियमवरच नाही, तर चेन्नईचा संघा या हंगामात जेवढ्या स्टेडियमवर खेळला. तेवढ्या मैदानांवर धोनीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते आल्याचे दिसले.

तसेच ज्याहीवेळी धोनी मैदानात दिसला, त्यावेळेच चाहते त्याच्या नावाने घोषणा देतानाही दिसले. पण हा आवाज इतका होता की आरोग्यास हानिकारकही ठरू शकतो. नुसताच आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यादरम्यान स्टार स्टोर्ट्सने चेन्नईच्या सामन्यावेळी धोनीच्या नावाने चाहते घोषणा देत असतानाच्या आवाजाच्या डेसिबल लेव्हलचा डेटा जाहीर केला आहे.

या डेटानुसार चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चाहत्यांच्या घोषणेवेळी डेसिबल लेव्हस १२० होती. ही लेव्हल विमानामधून निर्माण होणाऱ्या आवाजापेक्षाही अधिक आहे. विमानामधून साधारण 100 डेसिबलपर्यंत आवाज होतो.

धोनी जेवढ्याही मैदानावर आयपीएल 2023 मध्ये खेळला. या सर्व मैदानांवरील आवाजाच्या पातळीने जवळपास 110 डेसिबल ओलांडले होते. चेन्नईप्रमाणे लखनऊमध्येही जवळपास 120 डेसिबलपर्यंत नोंद झाली.

चेन्नईला पाचव्या विजेतेपदाची संधी

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला पाचव्या विजेतेपदाची संधी आहे. सोमवारी (29) चेन्नईला गुजरात टायटन्सविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. खरंतर हा अंतिम सामना रविवारी होणार होता. पण अहमदाबादला रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हा सामना राखीव दिवशी हलवण्यात आला.

धोनीसाठी स्पेशल सामना

हा अंतिम सामना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीसाठी विक्रमी ठरणार आहे. कारण हा धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी मैदानात उतरताच धोनी आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT