Pele  Dainik Gomantak
क्रीडा

Pele Video: पेले यांना अखेरचा अलविदा! हजारो चाहत्यांची अंतिम दर्शनासाठी उपस्थिती

पेले यांना मंगळवारी अखेरचा निरोप देण्यात आला.

Pranali Kodre

Fans pay tributes to Pele: ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे 29 डिसेंबर 2022 रोजी रात्री उशीरा निधन झाले. ते गेल्या काही काळापासून कोलन कँसरचा सामना करत होते. त्याचमुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. अखेर त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी कँसरशी लढताना अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी हजारो चाहते उपस्थित होते.

पेले यांच्या स्मरणार्थ सोमवारी सँतोस एफसीचे घरचे मैदान विला बेलमिरो स्टेडियमवर जागरण आयोजित करण्यात आले होते. पेले यांनी त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक सामने सँतोस संघासाठी खेळले होते.

विला बेलमिरो स्टेडियमच्या मध्यावर पेले यांचे कॅफेन ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो चाहत्यांनी स्टेडियममध्ये लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो आणि दक्षिण अमेरिकेचे कॉनमबोल फुटबॉल महासंघाचे प्रमुख अलेजांद्रो डोमिंगुएज देखील उपस्थित होते.

तसेच इन्फेंटिनो यांनी असाही प्रस्ताव ठेवला आहे की येणाऱ्या पिढीला पेलेंबद्दल माहिती रहावी म्हणून जगभरातील सर्व राष्ट्रीय फुटबॉल संघांनी त्यांचे नाव एका स्टेडियमला द्यायला हवे.

दरम्यान, पेले यांच्या पार्थिवाचे मंगळवारी साओ पावलोपासून 60 किलोमीटर दूर असलेल्या सँतोस शहरात दफन केले जाईल. त्यांच्या अंत्यसंस्काराला स्थानिकवेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल.

पेले हे फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये गणले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1958, 1962 आणि 1970 साली ब्राझीलसाठी वर्ल्डकप जिंकला आहे.

त्यांनी ज्यावेळी 1958 साली पहिला वर्ल्डकप जिंकला होता, त्यावेळी ते केवळ 17 वर्षांचे होते. साल 1958 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्यांनी गोलही केला होता. त्यांनी वर्ल्डकपमध्ये एकूण 12 गोल केले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1363 सामन्यांत 1281 गोल केल्याची नोंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suleman Siddiquie: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात! न्यायालयाचे निर्देश; 8 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

SCROLL FOR NEXT