Gautam Gambhir
Gautam Gambhir Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: लखनऊ - चेन्नई मॅचमध्ये 'कोहली...कोहली...' ऐकून चिडला गंभीर?

Pranali Kodre

Gautam Gambhir Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 1 मे रोजी लखनऊतील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवला होता. पण हा सामना निकालापेक्षा सामन्यानंतर झालेल्या मोठ्या वादामुळे चर्चेत राहिला.

या सामन्यात बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीचे लखनऊचा युवा गोलंदाज नवीन-उल-हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीरबरोबर वाद झाले होते. गंभीरबरोबर तर विराटचे सामन्यानंतर कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसले. या वादामुळे विराट आणि गंभीर दोघांवरही टीका झाली. तसेच बीसीसीआयकडूनही दंडाची कारवाई करण्यात आली.

पण अद्यापही या वादाची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू असून त्याची पडसात देखील उमटताना दिसत आहेत. बुधवारी (3 मे) लखनऊचा चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध एकाना स्टेडियमवरच सामना होणार होता.

या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यात दिसते की या सामन्यादरम्यान, गंभीर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना काही चाहत्यांनी 'कोहली... कोहली' असे नारे देण्यास सुरूवात केली. ते पाहून गंभीर थोडा मागे आला आणि त्याने 'कोहली... कोहली' ओरडणाऱ्या चाहत्यांकडे रागात पाहिले आणि तो नंतर पुढे निघून गेला.

हा सामना चेन्नई आणि लखनऊ संघांचा असताना कोहलीच्या घोषणा ऐकून गंभीर चिडला असावा असा अंदाज अनेक सोशल मीडिया युजर्सने लावला आहे.

बीसीसीआयकडून कारवाई

दरम्यान, विराटचे नवीन आणि गंभीर यांच्याबरोबर 1 मे रोजी झालेल्या सामन्यानंतर वाद झाल्याने बीसीसीआयने तिघांवरही कारवाई केली होती. या वादानंतर आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याने बीसीसीआयकडून विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला, तर नवीनवर सामनाशुल्काच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला.

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना रद्द

तसेच 3 मे रोजी होणारा लखनऊ आणि चेन्नई संघातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून लखनऊ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण 19.2 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि सामना थांबवण्यात आला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT