Fan Breaches Security to meet Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: विराट-गंभीरच्या राड्याआधी चाहत्यानं मारलेली मैदानात उडी अन् थेट कोहलीच्या...

सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाने सुरक्षा मोडत मैदानात उडी घेतलेली.

Pranali Kodre

Fan Breaches Security to meet Virat Kohli: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना झाला. या सामन्यात बेंगलोरने 18 धावांनी विजय मिळवला. पण हा सामना खेळाडूंच्या भांडणामुळे चर्चेत राहिला. पण याच सामन्यात विराट कोहलीचा एक चाहताही सुरक्षा मोडत मैदानात घुसला होता.

भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने लखनऊसमोर 127 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघ संघर्ष करत होता. त्यामुळे बेंगलोरचा स्टार खेळाडू विराट उत्साहात होता.

दरम्यान, तो सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना अचानक एक चाहत्याने मैदानातील सुरक्षा मोडली आणि तो थेट मैदानात घुसला. तो मैदानात गेल्यानंतर विराटसमोर गुडघ्यावर बसला. पण विराटने त्याला उठण्यास सांगितले. नंतर तो विराटच्या पायाही पडला. पण विराटने त्याला उठवत त्याची गळाभेट घेतली आणि त्याला परत त्याच्या जागेवर जाण्यास सांगितले.

यादरम्यान त्या चाहत्याला इतका आनंद झाला होता की त्याने तो मैदानातच सेलिब्रेट केला आणि नंतर तो कुंपण ओलांडून परत त्याच्या जागेवर जाऊ लागला. पण त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सामन्यानंतर खेळाडूंमध्ये वाद

दरम्यान, या सामन्यात विराटचे लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीरशी मोठे वाद झाले. नवीन अमित मिश्रासह फलंदाजी करत असताना त्यांची विराटशी शाब्दिक वादावादी झाली होती.

त्यानंतर सामन्यानंतरही नवीन आणि विराट यांच्यात वाद झाले. हे वाद नंतर इतके वाढले की नंतर विराट आणि गंभीर यांच्यातही कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसले. त्यांच्या भांडणात दोन्ही संघातील इतर खेळाडूंना आणि पंचांना मध्यस्थी करावी लागली. दरम्यान, या वादामुळे बीसीसीआयने विराट, गंभीर आणि नवीन यांच्यावर कारवाई देखील केली आहे.

विराट आणि गंभीर यांना सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय नवीनवरही सामनाशुल्काच्या 50 टक्के दंड करण्यात आलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT