Ethan Vaz (Goa) Dainik Gomantak
क्रीडा

Goa: एथनचा ऑनलाईन बुद्धिबळातील वरचष्मा कायम

पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई

Dainik Gomantak

पणजी: गोव्याचा (Goa) युवा बुद्धिबळपटू एथन वाझ (Young chess player Ethan Vaz) याने ऑनलाईन बुद्धिबळात (Online Chess) वरचष्मा कायम राखताना पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत (West Asian Chess Tournament) दोन सुवर्णपदके (2 Gold Medal) जिंकली. या स्पर्धेत त्याचा भारताच्या 10 वर्षांखालील संघात समावेश होता. ऑनलाईन स्पर्धा श्रीलंका बुद्धिबळ महासंघाने आशियाई बुद्धिबळ महासंघ व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) यांच्या सहकार्याने घेतली होती.

पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची एथनची ही दुसरी वेळ असून त्याने लौकिक कायम राखताना पुन्हा पदकांची कमाई केली. 2019 साली आठ वर्षांखालील वयोगटात त्याने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यंदा त्याने ऑनलाईन पद्धतीने खेळताना वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात अव्वल कामगिरी केली. स्पर्धेत पश्चिम आशियाई विभागातील 16 देशांतील 898 बुद्धिबळपटूनी भाग घेतला होता. स्पर्धेत भारतीय संघातून खेळलेल्या गोव्याच्या अन्य खेळाडूंत आठ वर्षांखालील गटात दिया सावळ हिने, तर 12 वर्षांखालील गटात एड्रिक वाझ प्रत्येकी साडेसहा गुणांसह समान नववा क्रमांक प्राप्त केला.

एथनला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला, मात्र नंतर त्याने जोरदार उसळी घेत आगेकूच राखली. सलग सात डाव जिंकत त्याने नऊ फेऱ्यांतून आठ गुणांची कमाई केली. पश्चिम आशियाई स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलेल्या एथनचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT