दिल्लीचा धुव्वा उडवून FC Goa उपांत्य फेरीत

लिअँडर ठरला सामन्याचा मानकरी
ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत Delhi FC विरुद्धच्या लढतीत चेंडू नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात FC Goa चा एदू बेदिया
ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत Delhi FC विरुद्धच्या लढतीत चेंडू नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात FC Goa चा एदू बेदियाDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पावसामुळे मैदानाच्या दर्जाविषयी समस्या असूनही एफसी गोवाने (FC Goa) शुक्रवारी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी दिल्ली एफसीचा (Delhi FC) 5-1 फरकाने धुव्वा उडवून 130व्या ड्युरँड कप फुटबॉल (130th Durand Cup Football) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (FC Goa in Semifinal) प्रवेश केला.

ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत Delhi FC विरुद्धच्या लढतीत चेंडू नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात FC Goa चा एदू बेदिया
गोव्याचे फ्रान्सिस यांचे आता इजिप्त फुटबॉलमध्ये योगदान

सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी म्युनिसिपल स्टेडियमवर झाला. विश्रांतीला एफसी गोवा संघ 3-0 फरकाने आघाडीवर होता. विश्रांतीपूर्वी देवेंद्र मुरगावकर, मुहम्मद नेमिल, ब्रँडन फर्नांडिस यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामना संपण्यास आठ मिनिटे असताना दिल्ली एफसीने पिछाडी एका गोलने कमी केली. नंतर लिअँडर डिकुन्हा व ॲलेक्झांडर रोमारियो जेसूराज यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून एफसी गोवाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.उपांत्य फेरीत आता एफसी गोवा संघासमोर बंगळूर एफसी व आर्मी ग्रीन यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल. अन्य उपांत्य सामना बंगळूर युनायटेड व मोहम्मेडन स्पोर्टिंग यांच्यात होईल.

ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत Delhi FC विरुद्धच्या लढतीत चेंडू नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात FC Goa चा एदू बेदिया
T-20 World Cup 2021च्या थीम साँगवर कोरिओग्राफर धनश्री वर्माचा जबदस्त डान्स

देवेंद्रच्या भेदक हेडरमुळे एफसी गोवाने 15व्या मिनिटास आघाडी प्राप्त केली. नंतर लगेच तीन मिनिटांनी नेमिल याचा नेम अचूक ठरला. सणसणीत फ्रीकिकवर 45+3व्या मिनिटास ब्रँडन फर्नांडिसने आघाडी आणखीनच भक्कम केले. निखिल माळी याने 82व्या मिनिटास दिल्लीसाठी गोल केल्यानंतर लिअँडर डिकुन्हा (84) आणि रोमारियो (90+2) याच्या गोलमुळे स्पर्धेत दुसऱ्यांदा एका लढतीत पाच गोल करण्याचा पराक्रम एफसी गोवाने साधला. लिअँडर सामन्याचा मानकरी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com