भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया (Enrique Norkia) कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. तो दुखापतींशी झुंज देत आहेत. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) ट्विट करुन ही माहिती दिली. एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याच्या जागी अद्याप कोणत्याही बदली खेळाडूचे नाव घोषित करण्यात आलेले नाही.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “दुर्दैवाने तो कसोटी सामन्याच्या गोलंदाजीची तयारी करु शकला नाही. सध्या तो तज्ञांचा सल्ला घेत आहे. त्याला रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
नॉर्खिया संघात बाहेरुन पडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीला मोठा फटका बसणार आहे. तो संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी यांच्या बरोबरीने तो गोलंदाजी करतो. नॉर्खियामध्ये 150 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना गंभीर अडचणी येऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेत उसळत्या चेंडूंसमोर अस्वस्थ होण्याचा भारताचा इतिहास आहे. नॉर्खियाने आतापर्यंत 12 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 16 टी-20 सामने खेळले आहेत.
नॉर्खियाची कसोटी कारकीर्द अशी आहे
2021 मध्ये नॉर्खिया देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षी पाच कसोटी सामन्यांमध्ये 20.76 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 37.6 राहिला. त्याने दोनदा पाच-पाच विकेट्स घेतल्या आहेत. 56 धावांत सहा बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या 28 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 47 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2019 मध्ये भारताविरुद्धच्या पुणे कसोटीतून पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेत भारताविरुद्ध त्याने अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही. नॉर्खियाने नुकतेच आयपीएल (IPL 2021) मध्ये खेळला आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचा (delhi capitals) भाग होता. या संघासाठी त्याने अप्रतिम कामगिरीही केली होती. यामुळे दिल्लीने त्याला आयपीएल 2022 पूर्वी कायम ठेवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.