Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Ben Stokes World Record: जरा हटकेच! बॅटिंग, बॉलिंग ना किपिंग... काहीच न करताही स्टोक्सने रचला इतिहास

इंग्लंडने आयर्लंडला लॉर्ड्स कसोटीत पराभूत केले, पण या सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने अनोखा विश्वविक्रम नोंदवला आहे.

Pranali Kodre

Ben Stokes World Record as a Test Captain: शनिवारी (3 जून) इंग्लंड संघाने आयर्लंडविरुद्ध लॉर्ड्वर झालेला एकमेव कसोटी सामना 10 विकेट्सने जिंकला. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.

बेन स्टोक्सचा अनोखा विक्रम

या सामन्यात अष्टपैलू खेळाडू असलेल्या स्टोक्सला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तसेच त्याने गोलंदाजीही केली नाही. तसेच इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळतो.

त्याचमुळे बेन स्टोक्स असा पहिलाच कर्णधार ठरला आहे, ज्याने कसोटी सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टीरक्षण असे कशातच योगदान न देताही विजय मिळवला आहे.

इंग्लंडने जिंकला सामना

इंग्लंड समोर दुसऱ्या डावात विजयासाठी आयर्लंडला केवळ ११ धावांचे आव्हानच ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने एकही विकेट न गमावता चार चेंडूतच पूर्ण केले. इंग्लंडकडून झॅक क्रावलीनेच 12 धावा केल्या. त्यामुळे या डावात स्टोक्सला फलंदाजी मिळाली नाही.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंड संघाचा पहिला डाव 56.2 षटकात 172 धावांवरच संपुष्टात आला होता. या डावात इंग्लंडकडून केवळ चार गोलंदाजांनी गोलंदाजी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तसेच जॅक लिचने ३ विकेट्स आणि मॅथ्यू पॉट्सने 2 विकेट्स घेतल्या. या तिघांव्यतिरिक्त जोश टंगनेही या डावात गोलंदाजी केली.

तसेच यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने पहिला डाव 82.4 षटकात 4 बाद 524 धावा करत घोषित केला. इंग्लंडकडून ऑली पोपने 205 धावांची खेळी केली. तसेच बेन डकेटने 182 धावांची खेळी केली.

याशिवाय झॅक क्रावली आणि जो रुट यांनी प्रत्येकी 56 धावांची खेळी केली. त्यामुळे पहिल्या डावातही स्टोक्सला फलंदाजी मिळाली नाही. दरम्यान, या डावात इंग्लंडने तब्बल 352 धावांची आघाडी मिळवली होती.

त्यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडने चांगली झुंज दिली. त्यांच्याकडून खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या अँडी मॅकब्रिन आणि मार्क अडेर यांनी अनुक्रमे नाबाद 86 आणि 88 धावांच्या खेळी केल्या. या दोघांमध्ये 8व्या विकेटसाठी 163 धावांची भागीदारीही झाली.

त्यांच्याआधी आयर्लंडकडून हॅरि टेक्टरनेही 51 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आयर्लंडने दुसऱ्या डावात 9 बाद 362 धावा केल्या. त्यांचा सलामीवीर जेम्स मॅककोलम रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे आयर्लंडला फक्त 11 धावांचे आव्हानच इंग्लंडसमोर ठेवता आले.

दरम्यान, या डावातही स्टोक्सने गोलंदाजी केली नाही. इंग्लंडकडून जोश टंगने या डावात 5 विकेट्स घेतल्या. तसेच स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स, जॅक लिच आणि जो रुट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT