Ben Stokes पडला 'गुरु'लाच भारी! जन्मभूमीत खेळताना रचला मोठा इतिहास

बेन स्टोक्सने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली असून आता तो कसोटीतील नवा 'सिक्सर किंग' ठरला आहे.
Ben Stokes
Ben StokesDainik Gomantak
Published on
Updated on

Ben Stokes: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात बे ओव्हल, माउंट मौनगानुई येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घालत न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सध्याचा इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमला मागे टाकले आहे.

न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या पण इंग्लंडकडून खेळणाऱ्या स्टोक्सने या सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 3 चौकार आणि 2 षटकारांसह 33 चेंडूत 31 धावांची खेळी केली. याबरोबर तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

Ben Stokes
SA vs ENG: इकडे बॅट्समन शॉट मारतोय अन् तिकडे पंच आपल्याच धूंदीत, Video एकदा पाहाच

त्याच्या नावावर आता 90 कसोटी सामन्यात 109 षटकार झाले आहेत. त्यामुळे त्याने मॅक्यूलमच्या 107 कसोटी षटकारांच्या विश्वविक्रमाला मागे टाकले.

महत्त्वाचे म्हणजे जेव्हा स्टोक्सने डावाच्या 50 व्या षटकात त्याचा पहिला षटकार मारत सर्वाधिक कसोटी षटकार मारण्याचा विक्रम नावावर केला, तेव्हा इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये मॅक्यूलमही बसलेला होता आणि त्याने टाळ्या वाजवत स्टोक्सला दादही दिली. मॅक्यूलमने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 101 कसोटी सामने खेळताना 107 षटकार मारले होते.

कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत स्टोक्स आणि मॅक्यूलमनंतर ऍडम गिलख्रिस्ट आहे. त्याने 100 षटकार मारले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आत्तापर्यंत या तिघांनाच कसोटीत 100 षटकारांचा टप्पा पार करता आला आहे.

कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

109 षटकार - बेन स्टोक्स (सामने - 90)

107 षटकार - ब्रेंडन मॅक्यूलम (सामने -101)

100 षटकार - ऍडम गिलख्रिस्ट (सामने -96)

98 षटकार - ख्रिस गेल (सामने -103)

97 षटकार - जॅक कॅलिस (सामने -166)

Ben Stokes
England vs New Zealand: कसोटी क्रिकेटमध्ये 'या' स्टार फलंदाजाने पहिल्यांदाच केला मोठा रेकॉर्ड, ऋषभ पंतही...

इंग्लंडचे पहिल्या कसोटीत वर्चस्व

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचे वर्चस्व दिसून येत आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दिलेल्या 394 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 5 बाद 63 धावा केल्या आहेत. अद्याप विजयासाठी त्यांना 331 धावांची गरज असून 5 विकेट्स हातात आहेत.

या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव 325 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर न्यूझीलंडने टॉम ब्लंडेलने केलेल्या 138 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 306 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 19 धावांची आघाडी मिळाली होती.

इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 374 धावा केल्या. तसेच 19 धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडसमोर 394 धावांचे आव्हान ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com