Ben Stokes: आरारा... खतरनाक! स्टोक्सने सीमारेषेवर केला चमत्कार; Video Viral

Australia vs England 2nd T20: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोमांचक स्पर्धा पाहायला मिळाली.
Ben Stokes
Ben StokesDainik Gomantak
Published on
Updated on

Ben Stokes Viral Video: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोमांचक स्पर्धा पाहायला मिळाली. या सामन्यात इंग्लंडने 8 धावांनी विजय मिळवला. क्रिकेट चाहते सध्या इंग्लंडच्या विजयापेक्षा अष्टपैलू बेन स्टोक्सचीच जास्त चर्चा करत आहेत. बेन स्टोक्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने असा पराक्रम केला की चाहते बघतच राहिले.

बेन स्टोक्सने एका हाताने चमत्कार केला

या सामन्यात फलंदाज म्हणून बेन स्टोक्स (Ben Stokes) अपयशी ठरला, पण क्षेत्ररक्षणात त्याने असा पराक्रम केला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात सॅम करन 15 व्या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकात ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टार फलंदाज मिचेल मार्शने जोरदार फटका लगावला. चेंडू जवळपास सीमारेषेपर्यंत पोहोचला होता, पण त्यानंतर स्टोक्सने हवेत उडी मारली आणि एका हाताने चेंडू सीमारेषेच्या आत फेकला. बेन स्टोक्सच्या या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Ben Stokes
India vs England:...पण अश्विनचा हा अप्रतिम झेल पाहा VIDEO

इंग्लंडने मालिका काबीज केली

डेव्हिड मलान (82) चे शानदार अर्धशतक आणि सॅम करन (25 धावांत 3 बळी) याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडने (England) दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 बाद 178 धावा केल्यानंतर 6 बाद 170 धावा केल्या. मलानने 49 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Ben Stokes
India Vs England: भारतीय संघाची ओपनिंगची समस्या अजुन वाढली

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली

मोईन अलीने (Moeen Ali) 27 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. मोईनने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. कर्णधार जोस बटलरने 13 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने 34 धावांत तीन आणि ऍडम झाम्पाने 26 धावांत दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 22 धावांत दोन विकेट गमावल्या. मिचेल मार्शने 29 चेंडूत 45 धावा करत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र 15 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो बेन स्टोक्सचा बळी ठरला. टीम डेव्हिडने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलिया लक्ष्यापासून दूर राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com