England Team X/englandcricket
क्रीडा

WI vs ENG: पहिल्या सामन्याचा व्हिलन दुसऱ्या वनडेत ठरला इंग्लंडचा हिरो! वेस्ट इंडिजला केलं चारीमुंड्या चीत

West Indies vs England, 2nd ODI: इंग्लंडने दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजला पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली.

Pranali Kodre

West Indies vs England, 2nd ODI:

इंग्लंडचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना अँटिग्वा येथे पार पडला, ज्यात इंग्लंडने 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. दुसऱ्या वनडेत इंग्लंडसाठी अष्टपैलू सॅम करन विजयाचा हिरो ठरला.

दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर 203 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 32.5 षटकात 4 बाद 206 धावा करत पूर्ण केले.

इंग्लंडकडून सॅम करनने शानदार गोलंदाजी करताना 7 षटकात 33 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने ब्रेंडन किंग, केसी कार्टी आणि शिमरॉन हेटमायर या महत्त्वाच्या फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात सॅम करनची गोलंदाजीच इंग्लंडच्या पराभवाच्या कारणांपैकी एक कारण होते. त्याने पहिल्या सामन्यात 9.5 षटकात तब्बल 98 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे तो इंग्लंडकडून एका वनडेत सर्वाधिक धावा खर्च करणाराही गोलंदाज ठरला होता.

मात्र, या सामन्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत आपल्याच गोलंदाजीने इंग्लंडला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

इंग्लंडने जिंकला दुसरा सामना

दुसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण वेस्ट इंडिजने 23 धावाच 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर शाय होप आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी 129 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 39.4 षटकात 202 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार शाय होपने 68 धावांची खेळी केली. तसेच रुदरफोर्डने 63 धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून सॅम करनव्यतिरिक्त लियाम लिव्हिंगस्टोनने 3 विकेट्स घेतल्या. तसेच गस ऍटकिन्सन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून विल जॅक्सने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार जॉस बटलरने 58 धावांची आक्रमक खेळी केली. त्याचबरोबर हॅरी ब्रुकने 43 धावांची खेळी केली, तर फिलिप सॉल्टने 21 धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना गुडाकेश मोतीने २ विकेट्स घेतल्या. तसेच रोमारियो शेफर्ड आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT