Brendon McCullum Dainik Gomantak
क्रीडा

बेटिंग कंपनीच्या जाहिरातीमुळे इंग्लंडचा कोच संकटात, ECB कडून मॅक्युलमची चौकशी सुरू

इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम बेटिंग कंपनीची जाहिरातीमुळे अडचणीत सापडला आहे.

Pranali Kodre

Brendon McCullum come under scrutiny: इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी संघाचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. कारण तो ऑनलाईन सट्टेबाजीच्या जाहिरातींमध्ये दिसला आहे. याबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ECB) चौकशी करत आहे.

माजी न्यूझीलंडचा कर्णधार असेलला मॅक्युलम 22बेट इंडिया, या सायप्रस येथील नोंदणीकृत ऑनलाईन बेटिंग कंपनीच्या जाहिरातीत दिसला आहे. पण ईसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांनुसार सामन्यांवरील सज्जेबाजीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांना परवानगी देत नाही.

पण मॅक्यूलम काही दिवसांपूर्वीच 22बेटच्या जाहिरातीत दिसला होता. त्याने 27 मार्च रोजी फेसबुक पेजवर एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यात आयपीएलसाठी 22बेटचा प्रचार करताना तो दिसला होता.

रिपोर्ट्सनुसार ईसीबीने म्हटले आहे की 'आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. ब्रेंडनबरोबरही 22बेटबरोबर त्याच्या संबंधाबद्दल चर्चा सुरू आहे. सट्टेबाजीबद्दल आमचे काही नियम आहेत आणि आम्ही नेहमीच याची काळजी घेतली आहे की त्यांचे पालन केले जाईल.'

न्यूझीलंडमधील प्रॉब्लेम गँबलिंग फाउंडेशनने मागील आठवड्यात या जाहिरातीबद्दल तक्रार केली होती.

याबद्दल मॅक्युलमच्या एजंटने टाईम्सशी बोलताना सांगितले आहे की 'आम्ही ईसीबीशी याबद्दल चर्चा करत आहोत. मी याबद्दल कोणतीही कमेंट सध्या करणार नाही. आम्ही यावर काम करत आहोत.'

मॅक्युलमने गेल्यावर्षी इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्विकारले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने कमालीची कामगिरी केल्या काही महिन्यात केली आहे. तो प्रशिक्षक बनल्यानंतर इंग्लंडने गेल्या 12 कसोटी सामन्यांमधील 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

मॅक्युलम हा न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याने त्याच्या कारकिर्दीत 101 कसोटी सामने खेळले असून 12 शतके आणि 31 अर्धशतकांसह 6453 धावा केले आहेत. तसेच 260 वनडे सामन्यात 5 शतके आणि 32 अर्धशतकांसह 6083 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 71 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 2 शतके आणि 13 अर्धशतकांसह 2140 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Orry in Goa: चक्क बनियानवर 'ऑरी' गोव्यात! सोशल मीडियावर Video Viral; म्हणाला, 'माय काईंड ऑफ गोवा डे'

Goa Live News: पंतप्रधान मोदी काणकोण दौऱ्यावर! भव्य स्वागतासाठी गोवा सज्ज: मंत्री रमेश तवडकर

SCROLL FOR NEXT