Matt Dunn Daughter  Dainik Gomantak
क्रीडा

Matt Dunn: दुर्दैवी! इंग्लडच्या क्रिकेटर दोन वर्षांच्या लेकीला गमावलं, क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त

इंग्लंडच्या 30 वर्षीय क्रिकेटपटूवर दोन वर्षीय लेकीचं निधन झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Pranali Kodre

Matt Dunn Daughter Passed Away: क्रिकेट जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. सरेचा क्रिकेटपटू मॅट ड्यून आणि त्याची पत्नी जेसिका यांच्या दोन वर्षांच्या मुलीचे फ्लोरेन्सचे दुर्मिळ आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे सध्या क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुवारी सरे क्रिकेट काऊंटी क्रिकेट क्लबने याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्यूनची मुलगी फ्लोरेन्स अपस्मार आजाराचा दुर्मिळ आणि गंभीर प्रकार असलेल्या ड्रेव्हेट सिंड्रोमचा सामना करत होती. या आजाराशी अखेर तिची लढाई संपली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.

सरेचे संचालक ऍलेक स्टीवर्ट यांनी याबद्दल म्हटले की 'आम्हाला फ्लोरेन्सच्या निधनाबद्दल ऐकून खूपच वाईट वाटले आहे. पण आमच्या संवेदना संपूर्ण ड्यून कुटुंबाबरोबर आहेत. आम्ही मॅट आणि जेसिकाला शक्य तो पूर्ण पाठिंबा देऊ.'

ड्यूनने त्याच्या लाडक्या लेकीचं निधन झाल्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फ्लोरेन्सचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की 'तू माझ्या हृदयात कायम राहशील'.

तसेच फ्लोरेन्सचा पालकांनी इंस्टाग्राम पोस्ट करत लिहिले आहे की 'या परिस्थितीत कोणतेही शब्द सापडणे जवळपास अशक्य आहे. तुझ्यावर अनेकांचे खूप प्रेम होते आणि तू अनेकांच्या आयुष्यावर जी छाप सोडली आहे, ती नक्कीच पाहण्यासारखी गोष्ट होती, तू प्रवेश करणाऱ्या प्रत्येक खोलीला उजळून टाकतेस. आम्हाला तुझ्याबद्दल आणि तुझ्या लढाईबद्दल नेहमीच अभिमान वाटत राहिल.'

ड्यून इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. तसेच वेगवान गोलंदाज असलेल्या ड्यूनने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 43 सामन्यांमध्ये 117 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 18 लिस्ट ए सामने खेळले असून त्यात त्याने 19 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 23 टी20 सामने खेळले असून यामध्ये त्याने 27 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT