England Cricket Team ANI
क्रीडा

IND vs ENG, Test: तिसऱ्या दिवसाखेर सामन्याला रोमांचक वळण! विजयासाठी इंग्लंडला 332 धावांची, तर भारताला 9 विकेट्सची गरज

India vs England, 2nd Test: विशाखापट्टणला भारत-इंग्लंड संघात सुरु असलेला दुसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर असून या सामन्यातील चौथा दिवस निर्णायक ठरू शकतो.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, 3rd Day:

भारत आणि इंग्लंड संघात विशाखापट्टणला शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 14 षटकात 1 बाद 67 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता इंग्लंडला विजयासाठी उर्वरित दोन दिवसात 332 धावांची गरज आहे, तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे.

या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन डकेट आणि झॅक क्रावली या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली होती.

डकेट आणि क्रावली 50 धावांची सलामी भागीदारी केली, पण अखेर आर अश्विनने तुफानी खेळ करणाऱ्या बेन डकेटला चकवले.

11 व्या षटकात अश्विनचा चेंडू खेळताना डकेट चूकला आणि त्यामुळे चेंडू उंच उडाला. यष्टीरक्षक केएस भरतने पळत पुढे येत सूर मारून हा झेल घेतला. त्यामुळे डकेट 28 धावांवर माघारी परतला.

त्यानंतर तिसऱ्या दिवसातील अखेरची काही षटके बाकी असल्याने रेहान अहमद नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा क्रावली 29 धावांवर, तर रेहान अहमद 9 धावांवर नाबाद आहे.

तत्पुर्वी तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 6 व्या षटकापासून आणि बिनबाद 28 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. मात्र सुरुवातीलाच जेम्स अँडरसनने भारताला मोठे धक्के दिले. त्याने रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या सलामीवीरांना बाद केले.

त्यानंतर शुभमन गिलने श्रेयस अय्यर बरोबर 81 धावांची तर अक्षर पटेलबरोबर 89 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. यादरम्यान, गिलने शतकी खेळीही केली. त्याने 147 चेंडूत १०४ धावा केल्या. तसेच अय्यरने 29 आणि अक्षरने 45 धावा केल्या. त्याचबरोबर अखेरीस आर अश्विनने २९ धावांची छोटेखानी खेळी केली.

दरम्यान, भारताकडून दुसऱ्या डावात गिल आणि अक्षर व्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे भारताचा दुसरा डाव 78.3 षटकात 255 धावांवर संपुष्टात आला. मात्र पहिल्या डावात मिळवलेल्या 143 धावांच्या आघाडीमुळे भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे आव्हान ठेवले.

दरम्यान, या सामन्यात भारताने पहिल्या डावात 112 षटकात सर्वबाद 396 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडने पहिल्या डावात 55.5 षटकात 253 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला 143 धावांची आघाडी मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

SCROLL FOR NEXT