Phil Foden with Son Ronnie  Instagram
क्रीडा

Ronnie Foden: भारतात वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लिश खेळाडूचा 4 वर्षांचा मुलगा होणार लखपती! एका जाहिरातीतून कमावणार 'इतके' पैसे

Phil Foden Son: इंग्लंडचा 23 वर्षीय स्टार फुटबॉलरचा चार वर्षांचा मुलाने मोठा मॉडेलिंग करार केला आहे.

Pranali Kodre

Phil Foden Four years Son Ronnie set to earn £10,000 for each brand endorsement reports :

जगभरात सध्या सोशल मीडियाची क्रेज मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियातून अनेकजणांनी स्टारडमही मिळवले आहे, यात इंग्लंड आणि मँचेस्टर सिटीचा २३ वर्षीय स्टार फुटबॉलपटू फिल फोडन याचा चार वर्षांचा मुलगा रोनी फोडन याचाही समावेश आहे.

रोनीचे इंस्टाग्रामवर वैयक्तिक अकाउंटही असून त्याला जवळपास ४ मिलियन फॉलोवर्स आहेत. गेल्या हंगामात मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीग जिंकल्यानंतर रोनी अधिक प्रकाशझोतात आला होता.

मँचेस्टर सिटीच्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये तो आपल्या वडिलांसह सहभागी झाला होता. त्याचे या सेलिब्रेशनदरम्यानचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. यावेळी त्याने स्टार खेळाडू एर्लिंग हालंडबरोबरही मस्ती करताना दिसला होता.

त्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंडलाही मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स मिळाली. त्याचे हे अकाउंट त्याचे आई-बाबा सांभाळतात. आता असे समजत आहे की त्याने एका मॉडेलिंग एजन्सीबरोबर करार केला आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार रोनीने प्रोपेल टॅलेंट ग्रुपसोबत मॉडेलिंगसाठी करार केला आहे. आता या करारातून त्याला प्रत्येक ब्रँडच्या जाहिरातीसाठी 10,000 पाउंड (भारतीय चलनानुसार साधारण साडे दहा लाख रुपये) मिळणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील रोनीने वेगवेगळ्या फॅशन ब्रँडच्या जाहीराती केल्या आहेत.

रोनी अल वे आणि द ड्युड या टोपन नावानेही ओळखला जातो. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या आई-बाबांनी त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्याला फुटबॉल चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते.

फोडनने भारतात जिंकलाय वर्ल्डकप

साल 2017 मध्ये भारतात 17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. त्यावेळी फोडन विजेतेपद मिळवलेल्या इंग्लंड संघाचा भाग होता.

त्याने या स्पर्धेचे विजेतेपद इंग्लंडला मिळवून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. अंतिम सामन्यात त्याने स्पेनविरुद्ध 2 गोल नोंदवले होते. तसेच तो गोल्डन बॉलचा मानकरीही ठरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT