FIFA World Cup 2026 Qualifier: छेत्री ब्रिगेडचा कतारकडून दारुण पराभव, पात्रता फेरीचा दुसरा सामना गमावला!

India vs Qatar: फिफा विश्वचषक 2026 च्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताला कतारचे खडतर आव्हान पार करता आले नाही.
India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier
India vs Qatar FIFA World Cup 2026 QualifierDajnik Gomantak

India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier: फिफा विश्वचषक 2026 च्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताला कतारचे खडतर आव्हान पार करता आले नाही. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर मंगळवारी भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाला एकही गोल करता आला नाही. कतारने हा सामना 3-0 असा जिंकला. कतारकडून मुस्तफा मेशाल, मोएझ अली आणि युसूफ अब्दुसिराग यांनी गोल केले.

अ गटातील कतारचा हा सलग दुसरा विजय आहे. त्याचवेळी भारताने सलामीच्या लढतीत कुवेतचा 1-0 असा पराभव केला होता.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. प्रतिस्पर्धी कतारने सामन्याच्या सुरुवातीला म्हणजेच चौथ्या मिनिटालाच गोल केला. कतारच्या मुस्तफा मशालने चौथ्या मिनिटाला आपल्या संघाचा आणि सामन्यातील पहिला गोल केला.

यानंतर भारतीय संघाने कतारला पहिल्या हाफपर्यंत दुसरा गोल करु दिला नाही. अशाप्रकारे पहिल्या हाफनंतर कतार 1-0 ने आघाडीवर राहिला. मात्र दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला कतारने दुसरा गोल केला.

दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनी म्हणजेच 47व्या मिनिटाला अल्मोज अलीने कतारसाठी दुसरा गोल केला. आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढल्या. कतार (Qatar) 2-0 ने अशी आघाडी घेतली होती. यानंतर भारतासाठी काही संधी निर्माण झाल्या, पण त्याचे रुपांतर गोलमध्ये होऊ शकले नाही.

India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier
FIFA World Cup 2026 Qualifiers: भारतीय फुटबॉल संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने; एशियन गेम्सची गटवारीही जाहीर

दरम्यान, कतारच्या दुसऱ्या गोलनंतर बराच वेळ सामना गोलविना सुरु राहिला. मात्र सामना संपण्याच्या काही वेळापूर्वी कतारने तिसरा गोल केला. युसूफने 86व्या मिनिटाला कतारसाठी तिसरा गोल केला. कतारच्या या गोलनंतर भारताच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. भारतीय संघाला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही.

India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier
FIFA World Cup विजयानंतर महिला खेळाडूला किस करणे पडले महागात, स्पॅनिश फुटबॉल अध्यक्षांवर निलंबनाची कारवाई

भारताने पहिला क्वालिफायर सामना जिंकला होता

भारतीय संघाने कुवेतसोबत फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup) पहिला क्वालिफायर सामना खेळला होता, ज्यामध्ये ब्लू टायगर्सने 1-0 ने विजय मिळवला होता. या सामन्यात मनवीरने भारतीय संघासाठी एक गोल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com