England Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022: श्रीलंकेवर मात करत इंग्लंडची उपांत्य फेरीत 'धडक'

England vs Sri Lanka T20 World Cup 2022: सिडनी येथे शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ४ विकेट्सने पराभव केला.

दैनिक गोमन्तक

England vs Sri Lanka T20 World Cup 2022: सिडनीमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 4 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंड उपांत्य फेरी गाठणारा दुसरा संघ ठरला आहे. इंग्लंडच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. सिडनीमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 142 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने 6 विकेट्स राखून सामना जिंकला. बेन स्टोक्स आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनी संघासाठी मॅच विनिंग इनिंग खेळी खेळली.

दरम्यान, इंग्लंडची (England) सुरुवात दमदार होती. श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्स संघासाठी सलामीला आले. यादरम्यान बटलरने 23 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. हेल्सने 30 चेंडूत 47 धावा केल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. हॅरी ब्रुक्स आणि लियाम विलिंगस्टोन फार काही करु शकले नाहीत. हे दोन्ही खेळाडू 4-4 धावा करुन बाद झाले. मोईन अली अवघ्या 1 धाव करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. सॅम करननेही 11 चेंडूत 6 धावा केल्या.

मार्क वुडची किलर गोलंदाजी

वेगवान गोलंदाज मार्क वुडने शेवटच्या षटकात तीन बळी घेत श्रीलंकेला (Sri Lanka) दीडशेचा टप्पा गाठू दिला नाही. वुडने 26 धावांत तीन बळी घेतले. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पथुम निसांकाने 45 चेंडूत 67 धावांची तुफानी खेळी करताना दोन चौकार आणि पाच षटकार खेचले. श्रीलंकेकडून आणखी एक मोठे योगदान भानुका राजपक्षेचे होते, ज्याने 22 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या.

गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पुनरागमन करत श्रीलंकेला धावसंख्या गाठण्यापासून रोखले. श्रीलंकेच्या संघाने आठ षटकांत 70 धावांचा टप्पा ओलांडला होता, पण नंतर इंग्लंडने शानदार पुनरागमन केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी धावांचा प्रवाह रोखला.

विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य होते

कुशल मेंडिसने 14 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावांचे योगदान दिले. मार्क वुडच्या डावातील शेवटच्या षटकात राजपक्षेने पहिल्या चेंडूवर चौकार मारला, पण त्यानंतर दुसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर तीन विकेट गमावल्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 142 धावांचे लक्ष्य मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT