Arshdeep Singh In T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 मध्ये अर्शदीप सिंग चांगली कामगिरी करत आहे. त्याने आपल्या किलर बॉलिंगने सर्वांची मने जिंकली आहेत. पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध त्याने शानदार गोलंदाजी केली. आता तो T20 विश्वचषक 2022 मध्ये आणखी चार विकेट घेऊन माजी भारतीय वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंगचा विक्रम मोडू शकतो. त्याबद्दल जाणून घेऊया...
अर्शदीप सिंग हा विक्रम करु शकतो
T20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये अर्शदीप सिंगने सुरुवातीच्या आणि डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करुन सर्वांची मने जिंकली आहेत. अर्शदीपने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत 4 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. जर त्याने 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेतल्या तर तो T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल.
या दिग्गजाचा विक्रम मोडू शकतो
अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेविरुद्ध 4 विकेट घेतल्यास सध्याच्या T20 विश्वचषकात त्याच्याकडे 13 विकेट होतील आणि तो माजी भारतीय वेगवान गोलंदाज आरपी सिंगचा विक्रम मोडेल. टी20 विश्वचषकाच्या एका मोसमात भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आरपी सिंगच्या नावावर आहे. 2007 मध्ये त्याने 12 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये इरफान पठाण (Irfan Pathan) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2007 मध्ये त्याने 10 विकेट्स घेतल्या होत्या.
छोट्या कारकिर्दीत प्रभावित
अर्शदीप सिंगने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत सर्वांना प्रभावित केले आहे. तो डावाच्या सुरुवातीला धोकादायक गोलंदाजी करतो. त्याच्याकडे एवढी क्षमता आहे की, तो कोणत्याही फलंदाजी आक्रमणाचा पाडाव करु शकतो. त्याने भारताकडून खेळताना 17 टी-20 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्यावर खूप विश्वास ठेवतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.