Joe Root - Ben Stokes X/CountyChamp
क्रीडा

IND vs ENG: इंग्लंडची पहिल्या कसोटीसाठी एकदिवस आधीच 'Playing-11' जाहीर! 'हे' खेळाडू भारताविरुद्ध उतरणार मैदानात

England Playing XI: भारताविरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

England Cricket announced playing XI for first Test of the series against India:

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंडला भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादला 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांचा प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्लेइंग इलेव्हनमध्ये इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला संधी देण्यात आलेली नाही. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जॅक लीच आणि रेहमान अहमद या फिरकीपटूंसह टॉम हार्टलीलाही संधी मिळाली आहे.

फिरकी गोलंदजी करणारा हार्टली या सामन्यातून पदार्पण करेल. तसेच जो रुट हा इंग्लंडचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाजही फिरकी गोलंदाजी करू शकतो.

याशिवाय मार्क वूडलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पूर्णवेळ वेगवान गोलंदाजी करू शकणारा वूड एकमेव पर्याय आहे.

तसेच फलंदाजी फळीत झॅक क्रावली आणि बेन डकेट सलामीला फलंदाजी करतील, तर मधल्या फळीत रुटसह बेन स्टोक्स, ऑली पोप हे आहेत. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टो आणि बेन फोक्स हे दोन यष्टीरक्षक फलंदाजही प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत.

इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पोप, फोक्स, रेहान आणि लीच यांचे पुनरागमन झाले आहे. या चौघांचाही इंग्लंडने अखेरीस खेळलेल्या कसोटी सामन्यात समावेश नव्हता.

दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन -

झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: मोपा विमानतळावर सॅटेलाईट डिव्हाईस बाळगणाऱ्या रशियन नागरिकाविरोधात एका दिवसात गुन्हा आणि आरोपपत्र दाखल

SCROLL FOR NEXT