England Team  Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs AUS: कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' अनोखा पराक्रम, इंग्लंडच्या संघाने सर्वांना केले आश्चर्यचकित!

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली.

Manish Jadhav

ENG vs AUS, 1st Test: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. कधी फलंदाज सर्वांना चकीत करतात, तर कधी गोलंदाजाला ती संधी मिळते. पण इथे एका संघाने सर्वांना चकीत केले आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कसोटी क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडले

एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात असा अनोखा पराक्रम घडला, जो 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात शोधूनही सापडणार नाही. या सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने 393 धावा उभारल्या आणि डाव घोषित केला.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये हे सहसा क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळेच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या या निर्णयाने अचानक सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. असे पूर्वी पाच वेळा घडले आहे.

यासह, कॅलेंडर वर्षात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी डाव घोषित करणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी, कोणत्याही संघाला हे करता आलेले नाही. या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 325 धावा करुन डाव घोषित केला होता.

6 व्यांदा पाहायला मिळाले

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाने सामन्याच्या पहिल्याच दिवशी डाव घोषित करण्याची ही सहावी वेळ आहे.

या यादीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेची नावे प्रत्येकी दोनदा आहेत, तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानेही प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे. मात्र, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी डाव घोषित करणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला.

जो रुटने आपले 30 वे कसोटी शतक साजरे केले

दुसरीकडे, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा फलंदाज जो रुटने शानदार शतक झळकावले. त्याने 152 चेंडूंचा सामना करत 118 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 4 षटकारही आले.

2015 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) रुटचे हे पहिले कसोटी शतक आहे. यासह रुटच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 46 शतके आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने विकेट न गमावता 14 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा (4) आणि डेव्हिड वॉर्नर (8) क्रीजवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT