Ajit Wadekar Twitter
क्रीडा

Ajit Wadekar Birth Anniversary: देशांतर्गत क्रिकेटचा अजरामर राजा 'वाडेकर'

अवघ्या 3 रुपयासाठी अभियंता झाला क्रिकेटपटू, सुनील गावस्कर, काका माधव मंत्री यांना भेटल्यानंतर पालटले नशीब

दैनिक गोमन्तक

आज माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांची जयंती आहे, ज्यांनी भारताला परदेशी भूमीवर कसोटी मालिकेत पहिला विजय मिळवून दिला होता . त्यांचा जन्म 1 एप्रिल 1941 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला होता. वाडेकर हे उत्कृष्ट 'स्लिप फिल्डर', आक्रमक फलंदाज, उत्कृष्ट कर्णधार आणि भारतीय संघाचे यशस्वी प्रशिक्षक आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बस प्रवासाने झाली.

अवघ्या 3 रुपयासाठी अभियंता झाला क्रिकेटपटू

एकदा वाडेकर माजी भारतीय क्रिकेटपटू बाळू गुप्तेसोबत बसने एल्फिन्स्टन कॉलेजला जात होते. बाळू गुप्ते त्यांच्याच कॉलेजमध्ये दोन वर्ष सिनियर होते. गुप्ते हे कला शाखेचे तर वाडेकर विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. 'ईएसपीएन' या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, वाडेकर यांना अभियंता बनायचे होते. बाळू आणि वाडेकर एकाच बसने कॉलेजला जायचे. एके दिवशी बाळू गुप्तेने त्यांना विचारले, "अजित, तू आमच्या कॉलेजच्या क्रिकेट संघाचा बारावा खेळाडू होशील का?' त्यांची 11 उत्कृष्ट खेळाडूंची टिम होती, पण त्यांच्याकडे मैदानावर पाणी वाहून नेणारा खेळाडू नव्हता. वाडेकर यांनी आपल्या क्रिकेटपटू बनण्याची कहाणी सांगताना सांगितले की, यासाठी त्यांना एका दिवसासाठी 3 रुपयांची ऑफर मिळाली. 1957 मध्ये तीन रुपये खूप होते, येथून त्यांनी क्रिकेटच्या दुनियेत पाऊल ठेवले.

सुनील गावस्कर, काका माधव मंत्री यांना भेटल्यानंतर नशीब पालटले

त्यानंतर वाडेकरांनी कॉलेजमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेथे त्यांची भेट सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचे काका माधव मंत्री यांच्याशी झाली. अभ्यासामुळे तो सरावासाठी खूप उशिरा मैदानावर पोहोचायचा. एके दिवशी माधव मंत्री यांनी वाडेकरांना नेटमध्ये फलंदाजी करण्यास सांगितले. यानंतर माधव मंत्री यांनी कॉलेज संघाच्या कर्णधाराला सांगितले की, वाडेकर संघात नियमितपणे खेळत राहतील.

अजित वाडेकर यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

एकेकाळी परदेशात भारतीय संघाचा (Indian Cricket Team) विजय अशक्य मानला जात होता. वाडेकर यांनी भारतीय संघाला परदेशी भूमीवर विजयाची चव चाखवली. त्यांनी भारताला इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. त्यांनी 37 कसोटी सामने खेळले आणि 31.07 च्या सरासरीने 2113 धावा केल्या. त्याने 1967-68 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकमेव शतक झळकावले होते. 90 किंवा त्याहून अधिक धावा करून वाडेकर चार वेळा बाद झाले, पण शतक पूर्ण करू शकले नाही. ते भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. मात्र, ते दोनच सामने खेळले. मोहम्मद अझरुद्दीनच्या कर्णधारपदाच्या काळात वाडेकर हे 1990 च्या दशकात भारतीय संघाचे व्यवस्थापकही होते. नंतर ते निवड समितीचे अध्यक्षही होते.

देशांतर्गत क्रिकेटचा अजरामर राजा वाडेकर

वाडेकर यांनी 237 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 15380 धावा केल्या आहेत. 1966-67 रणजी ट्रॉफी सामन्यात त्यांनी म्हैसूरविरुद्ध 323 धावांची सर्वोत्तम धावसंख्या केली. वाडेकर यांनी दुलीप ट्रॉफीचे एकूण 18 सामने खेळले. ते सहा वेळा पश्चिम विभागाचे कर्णधारही होते. त्यांनी सहा वेळा बॉम्बे संघाचे कर्णधारपदही भूषवले. वाडेकर यांनी 1967 च्या इंग्लंड दौऱ्यात काउंटी सामन्यांमध्ये 835 धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 36 शतके आणि 84 अर्धशतके आहेत. 15 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईतच त्यांचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:मंत्री माविनचे 'सांबा', 'कालिया' काय करतात हे त्यांना माहित नाही"

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

SCROLL FOR NEXT