दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी बुधवारी इंग्लंडचे (England) माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasir Hussein) यांच्यावर टीका केली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: विराटच्या आक्रमक अंदाजावरुन गावसकर आणि हुसेन यांच्यात तू..तू..मैं..मैं..

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) संघात पाहिली आणि त्याने या आक्रमकतेची सुरुवात केली, जी विराट कोहलीने (Virat Kohli) पुढे सुरु ठेवली आहे.

दैनिक गोमन्तक

क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी बुधवारी इंग्लंडचे (England) माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasir Hussein) यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणले, सध्याच्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील संघापेक्षा भारताच्या (India) मागील संघांना मैदानात धमकावणे (Bullying) अधिक सोपे होते. कसोटी सामन्यांमध्ये प्रथम 10 हजार धावा करणार्‍या सुनील गावसकर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच वेळा (1971, 1974, 1979, 1982, 1986) इंग्लंडचा दौरा केला.

आमच्या पिढीतील क्रिकेटपटूंना सांगितले जायचे जर क्रिकेटपटूंना धमकाविले गेले तर ते नाराज होऊ शकतात. गावसकर आणि हुसेन यांच्यात एका लेखावरून वाद झाला. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने हा लेख एका ब्रिटिश वृत्तपत्रासाठी लिहिला होता. या लेखात नासिर यांनी लिहिले आहे की, पूर्वीचा भारतीय संघ हा सध्याच्या संघापेक्षा तुलनेत एका युनिटइतके मजबूत नव्हता, सध्याच्या मालिकेत भारताने इंग्लंडवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

माजी भारतीय कर्णधार गावसकर यांनी ऑन एअर हुसेनला विचारले, तुम्ही म्हणालात की या भारतीय संघाला धमकावले जाऊ शकत नाही, तर मागील पिढीचे संघांच्या बाबतीत ते केले जाऊ शकत होते. आधीच्या पिढीबद्दल बोलताना, तुम्ही सांगू शकता का, कोणती पिढी? आणि गुंडगिरी म्हणजे नक्की काय?

यावर हुसेन म्हणाले, 'मला फक्त असे वाटते की, आधीचे भारतीय संघ इतके आक्रमक नव्हते, पण कोहलीने जे केले ते दुहेरी आक्रमकता दर्शवत आहे. त्याची एक झलक मी सौरव गांगुलीच्या संघात पाहिली आणि त्याने या आक्रमकतेची सुरुवात केली, जी विराट कोहलीने पुढे सुरु ठेवली आहे. विराट संघात नसतानाही अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियन संघावर वर्चस्व गाजवले.

पण गावसकर यांनी हुसेन यांचे दावे काही आकडेवारीने खोडून काढत ते म्हणाले, "मागील पिढीतील भारतीय संघांला धमकाविले जाऊ शकत होते. असे जर तुम्ही म्हणत असाल तर त्या गोष्टीचा मला राग येईल. जर तुम्ही रेकॉर्ड बघितले तर 1971 मध्ये आम्ही जिंकलो, त्यावेळी माझा इंग्लंडचा पहिलाच दौरा होता. 1974 मध्ये आम्हाला अंतर्गत समस्या होत्या त्यामुळे आम्ही 0-3 ने हरलो. 1979 मध्ये आमचा 0-1 ने परभव झाला होता. ओव्हलवर 438 धावांचा पाठलाग केला असता तर 1-1 मालिकेत बरोबरीत झाली असती. ज्यावेळी हा सामना अनिर्णित राहिला त्यावेळी भारतीय संघाच्या 8 बाद 429 धावा झाल्या होत्या.

गावसकर म्हणाले, '1982 मध्ये आम्ही 0-1 ने हरलो. 1986 मध्ये आम्ही 2-0 जिंकलो, तेथे आम्ही 3-0 ही जिंकू शकलो असतो. त्यामुळे आमच्या पिढीला दादागिरी करता आली नाही असे मला वाटत नाही.

ते म्हणाले, आक्रमक असणे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर उत्तर द्यावे लागेल. तुम्ही उत्कटता दाखवू शकता, प्रत्येक गडी बाद झाल्यावर ओरडल्याशिवाय तुम्ही तुमच्या संघाशी बांधिलकी दाखवू शकता. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT