माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे.
माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: रोहित शर्माबाबत सचिन तेंडुलकरचे मोठे विधान

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या सलामीवीरांनी अप्रतिम कामगिरी केली. लॉर्ड्सच्या मैदानावर केएल राहुलने शानदार शतक झळकावले, तर दुसरीकडे रोहित शर्माने 83 धावांची दमदार खेळी खेळली. आता माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्माबद्दल मोठे विधान (Sachin Tendulkar's big statement about Rohit Sharma) केले आहे.

सचिन पीटीआयला म्हणाला, रोहित इंग्लंडमध्ये कसा खेळतोय ते बघत आहे. "मी जे काही पाहिले ते मला वाटते की त्याने आता त्याच्या फलंदाजीत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने आपली दुसरी बाजू दाखवली आहे. त्याने आपल्या फलंदाजीने हे दाखविले आहे की, तो गरजेनुसार आपला खेळ बदलू शकतो. त्याने सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळायला सुरुवात केली आहे. "

तेंडुलकर पुढे म्हणाला, “रोहित एका लिडर सारखा मैदानात उभा राहत आहे आणि त्याला केएल राहुलची तेवढीच चांगली साथ मिळत आहे. राहिला प्रश्न पुल शॉट खेळण्याचा तर त्याने त्या शॉटने अनेक वेळा चेंडू सीमेवर मारला आहे. दोन्ही कसोटीत त्याने संघासाठी काय साध्य केले याकडे मी पहात आहे. रोहित बाहेर जाणारा चेंडू सोडत आहे. तो नेहमीच एक महान खेळाडू होता. पण इंग्लंडमधील त्याची आतापर्यंतची खेळी पाहून मी असे म्हणू शकतो की त्याने त्याची फलंदाजी निश्चितच उंचावलेली आहे.

इंग्लंडच्या फलंदाजीबाबत सचिन म्हणाला की, मला असे वाटत नाही की जो रूट हा वन मॅन आर्मी प्रमाणे खेळत आहे. तो वगळता कोणीही या इंग्लिश फलंदाजी क्रमवारीत मोठे शतक झळकावू शकेल असे सध्या तरी दिसत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT