Eng Vs Ind: माजी क्रिकेटपटू जेफ्री बॅायकॅाटने उपस्थित केले रुटच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

जो रुटच्या फलंदाजीचा जेवढा आदर, तेवढाच त्याच्या रणनीतीविषयी निराश (Eng Vs Ind)
Lords Test: Former cricketer Jeffrey Boycott questioned Root's captaincy (Eng Vs Ind)
Lords Test: Former cricketer Jeffrey Boycott questioned Root's captaincy (Eng Vs Ind) Dainik Gomantak

भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात (Lords Test Match) झालेल्या पराभवानंतर जो रूटच्या नेतृत्वावर व इंग्लंड संघावर टीका केली जात आहे, या वेळी माजी दिग्गज क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनीही इंग्लंड संघाचा खरपूस समाचार घेतला, ते म्हणाले की इंग्लिश संघाने रणनिती आखण्याच्या बाबतीत ढिलाईपणा दाखवला व भावनांना आवर घालू शकले नाही. तसेच त्यांनी भारतीय संघाचे कौतुकही केले. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंड संघाने रिषभ पंत आणि इशांत शर्माच्या विकेट घेत सामन्यावरील इंग्लंडची पकड घट्ट केली, मात्र इंग्लंड संघाने भारतीय टेल इंडर्सना हलक्यामध्ये घेतले. त्यामुळे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने भारतासाठी उपयुक्त अशी 89 धावांची नाबाद भागीदारी केली. आणि इंग्लंडला 272 धावांचे कठीण लक्ष्य देण्यात यशस्वी ठरले, आणि यजमान इंग्लंड संघ 272 धावांचे आव्हान पेलू शकला नाही आणि 151 धावांनी इंग्लंड संघ पराभूत झाला. (England Lost Lords Test Match)

Lords Test: Former cricketer Jeffrey Boycott questioned Root's captaincy (Eng Vs Ind)
ENG vs IND: विराट,रोहित यांच्यात वाद आहेत, असे बोलणाऱ्यांनी एकदा हा व्हिडिओ पहाच...

बॉयकॉटने टेलिग्राफमध्ये लिहिले की लॉर्ड्स कसोटी सामन्याने 2 गोष्टी सिद्ध केल्या. पहिली म्हणजे, जर तुम्ही गाफील असाल, तर तुम्ही कसोटी सामना जिंकण्यासाठी योग्य नाही, जो रुटला त्याच्या अप्रतिम फलंदाजीसाठी आम्ही प्रेम करतो, परंतु त्यांच्या रणनीतीबद्दल तितकेच निराश झालो आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लंड संघ नेहमीच रूटच्या फलंदाजीवर अवलंबून राहू शकत नाही, उर्वरित सामन्यात इंग्लंडकडून सुधारणा आवश्यक आहे, कारण परिस्थिती आता गाफिल राहण्याच्या पलीकडे गेली आहे. (Eng Vs Ind)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com