भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या (Jaspreet Bumrah) कामाचा ताण आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मबद्दल चिंतित असेल, अजिंक्यला कदाचित त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाचवण्याची ही शेवटची संधी असेल.
भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या (Jaspreet Bumrah) कामाचा ताण आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मबद्दल चिंतित असेल, अजिंक्यला कदाचित त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाचवण्याची ही शेवटची संधी असेल. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: भारताला 13 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी

दैनिक गोमन्तक

ENG vs IND: भारताला (India) 13 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये (England) मालिका जिंकण्याची संधी आहे. याआधी भारताने (India) 2007 मध्ये राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली यजमानांचा 1-0 असा पराभव केला होता. ऐतिहासिक विजय नोंदवण्याच्या मार्गावर असताना, भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या (Jaspreet Bumrah) कामाचा ताण आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मबद्दल चिंतित असेल, अजिंक्यला कदाचित त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाचवण्याची ही शेवटची संधी असेल.

पाचव्या कसोटीत असे असेल हवामान

हवामान विभागाने पहिले दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मालिकेत 2-1 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघासाठी ही आनंदाची बाब आहे. जर विराट कोहलीने मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलिया (2018-19) आणि इंग्लंड (2021) मध्ये कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनेल. गेल्या चार कसोटींप्रमाणेच पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड हा चर्चेचा विषय असेल. बुमराहने गेल्या एका महिन्यात 151 षटके टाकली आहेत, ज्यात ओव्हल कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसांत 22 षटकांचा समावेश आहे. भारताने तो कसोटी सामना 157 धावांनी जिंकला.

ओव्हलमधील फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरलेल्या रहाणेला संघात ठेवावे की नाही यावरही संघ व्यवस्थापन विचार करत आहे. सात पैकी सहा डावांमध्ये अपयशाने रहाणेचा आत्मविश्वास डळमळीत झाला असता. मालिकेतील ही शेवटची कसोटी असल्याने कोहली त्याला आणखी एक संधी देऊ शकतो. यात अपयशी ठरल्यास त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळजवळ संपुष्टात येईल असे बोलले जात आहे.

जर त्याला संधी मिळाली नाही, तर इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणण्यासाठी सूर्यकुमार यादव किंवा हनुमा विहारी यांना संधी दिली जाऊ शकते. वर्कलोड मॅनेजमेंट हा भारतीय संघासाठी विशेषतः बुमराहसाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या सामन्यात ज्या प्रकारे त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना त्रास दिला त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेऊन देखील चालणार नाही.

तर मोहम्मद शमी तंदुरुस्त झाल्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल याची खात्री आहे. पण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या अनुपस्थितीत कर्णधार कोहलीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल. कोरोना संसर्गामुळे शास्त्री आणि भरत अरुण यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहेत. बुमराहला गोलंदाजांच्या अनुकूल परिस्थितीपासून दूर ठेवण्याचा निर्णय शहाणपणाचा ठरणार नाही, पण सहा आठवड्यानंतर टी -20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे बुमराहबाबत भारतीय संघ कोणताही धोका घेऊ इच्छित नाही.

उमेश यादव (सहा विकेट) आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर (3 विकेट आणि 117 धावा), ज्यांनी शेवटच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली आहे. ते खेळाण्यास तयार आहेत. बुमराहला विश्रांती दिल्यास मोहम्मद सिराजला वगळले जाऊ शकते. रविचंद्रन अश्विनपेक्षा रवींद्र जडेजाला प्राधान्य देण्याचा कोहलीचा निर्णय पूर्णपणे नाही तर अंशतः बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, शार्दुलने फलंदाजीत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर आता जडेजाच्या जागी अश्विनला संधी मिळू शकते. सराव सत्रादरम्यान चेतेश्वर पुजाराच्या क्षेत्ररक्षणाची चित्रे पाहून त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल.

दुसरीकडे, इंग्लंड संघाचा सर्व दारोमदार कर्णधार जो रूट इंग्लंडसाठी याच्यावरच आहे. त्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करावीच लागणारच आहे. बेअरस्टोची जागा घेऊ शकणारा उपकर्णधार जोस बटलर रूटला पाठिंबा देईल. त्याच वेळी, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स गोलंदाजीतील नवीन चेंडू हाताळतील.

यातून होणार संघ निवड:

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर.

इंग्लंड: जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, हसीब हमीद, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, डॅन लॉरेन्स, ओली रॉबिन्सन, सॅम कुरन, मार्क वुड, जेम्स अँडरसन, जॅक लीच, ओली पोप, डेव्हिड मलान.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT