सामन्याआधी विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती, यामुळे हे दोघेही बीसीसीआयच्या (BCCI) निशाण्यावर होते.
सामन्याआधी विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती, यामुळे हे दोघेही बीसीसीआयच्या (BCCI) निशाण्यावर होते. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: रवी शास्त्री, विराट कोहली यांनी बायो-बबल तोडल्याने BCCI नाराज

दैनिक गोमन्तक

ENG vs IND: विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ओव्हल (Oval) सामन्यापूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या (Book publishing) कार्यक्रमात हजेरी लावल्याने आता बीसीसीआयने (BCCI) यावर नाराजी व्यक्त केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test series) चौथा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये भारतला मोठा विजय मिळाला आहे. मात्र, या सामन्याआधी विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती, यामुळे हे दोघेही बीसीसीआयच्या निशाण्यावर होते.

याबाबत बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, " प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली गेल्या आठवड्यात लंडनमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यावर नाराज आहे. शास्त्री यांची कोरोना चाचणी सकारात्मक चाचणी आल्याने, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, फिजिओ नितीन पटेल यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून सध्या त्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.

शास्त्री, कोहली आणि टीमचे इतर सदस्य गेल्या मंगळवारी एका हॉटेलमध्ये पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमास सहभागी झाले होते. जिथे कार्यक्रमाची खोली लोकांनी भरलेली होती. शास्त्री आणि कोहली यांनी कार्यक्रमाचे देखील स्टेज शेअर केले. बीसीसीआयच्या सूत्रांनी उघड केले की भारतीय संघाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी बोर्डाकडून योग्य मान्यता घेतली नव्हती.

यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ECB कडून देखील मान्यता घेतली नव्हती. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सोमवारी एका माध्यमाशी बोलताना सांगितले, “कार्यक्रमाचे फोटो बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केले गेले आहेत. मंडळ या प्रकरणाची चौकशी करेल. चौथ्या कसोटीनंतर ओव्हलमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधार यांना याबाबत विचारले जाईल. संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांची याबाबतची भूमिकाही तपासण्यात येईल.

ब्रिटिश मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय संघाने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची (ECB) परवानगीही घेतली नाही. बीसीसीआय ईसीबीच्या संपर्कात आहे, पुढे अशाप्रकारची कोणतीही घडू नये आणि अडथळ्या विना मालिका पूर्ण व्हावी असा BCCI आणि ECB प्रयत्न करत आहे. तूर्तास, शास्त्री लवकरच बरे होतील अशी सर्वांना आशा आहे. टी -20 विश्वचषकासाठी संघाची निवड करण्यासाठी बुधवारी बैठक होणार आहे. हे प्रकरणावर यावेळी चर्चा करण्यात येईल.

ज्या ठिकाणी गर्दी नाही तेथे सदस्यांना फिरण्याची परवानगी आहे. गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नये असे दोन्ही मंडळांकडून या आधीच सांगण्यात आले होते, त्यामुळे रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

“तसेच हा कार्यक्रम अधिकृत देखील नव्हता, जो कोणत्याही मंडळाने आयोजित केला होता. त्यामुळे ही घटना आणखी त्रासदायक आहे, कारण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मालिकेच्या अगोदर संघातील प्रत्येक सदस्याला पत्र लिहून त्यांना सतर्क राहण्यास आणि जास्त गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये असे सांगितले.

अर्थात, हे निश्चितपणे सांगता येत नाही की, या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानेच शास्त्री आजारी पडले. हॉटेलमध्ये टीमने वापरलेली लिफ्ट इतर पाहुण्यांकडून देखील वापरली जाते. तथापि, पण तरी मंडळाला वाटते की हा कार्यक्रम वगळता आला असता.

संघातील प्रत्येक सदस्याची रविवारी कोरोना चाचणी घेण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत निकालाची प्रतीक्षा होती. संक्रमित सपोर्ट स्टाफ 10 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी टीमसोबत मँचेस्टरला जाणार नाही.

दोन्ही संघ मँचेस्टरमध्ये कठोर बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर पाचवी कसोटी संपल्यावर पाच दिवसांनी आयपीएल यूएईमध्ये होणार आहे. खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीला बायो-बबलमध्ये प्रवास करावा लागेल, अन्यथा दुबईत आल्यावर त्यांना विलगिकरणाच्या कालावधीतून जावे लागेल. त्यामुळे अशी आशा आहे की, टीम बायो-बबलमध्ये प्रवेश केल्यावर यापुढे कोणतीही घटना होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT