आज या दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना दोन्ही सुरु होणार आहे.
आज या दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना दोन्ही सुरु होणार आहे. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: हेडिंग्लेतील-लीड्स मैदान भारतासाठी 'लकी'

दैनिक गोमन्तक

टीम इंडिया (Team India) 1967 पासून हेडिंग्ले मैदानावर (Headingley on the field) अजिंक्य आहे, यामुळे इतिहासात (In history) पाहिल्यास तिसऱ्या कसोटीत (In the third test) विराट सेनेचा (Virat Kohli) विजय दृष्टीपथात दिसत असला तरी इंग्लंड संघाला (England team) कमी लेखून चालणार नाही. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असून, तेथे भारतीय संघ इंग्लंड विरुध्द पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिल्या कसोटीत शेवटचा दिवशी निकाल लागणार असे दिसत असताना पावसाने जोरदार बॅटींग केल्याने तो दिवस पाण्यात गेला आणि सामना अनिर्णीत राहीला. पण लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडीयाने दमदार कामगिरी केली आणि सामना 151 धावांनी जिंकला. आज या दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना दोन्ही सुरु होणार आहे.

हा सामना हेडिंग्ले-लीड्स येथील मैदानावर खेळला जाईल. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. गेल्या 54 वर्षांपासून भारताने या मैदानावर एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या मैदानावर टीम इंडियाला 1967 साली झालेल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतू त्यानंतर भारतीय संघाने येथे सामना गमावलेला नाही.

आजपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताने येथे शेवटचा कसोटी सामना 2002 मध्ये खेळला होता. टीम इंडियाने तो सामना एक डाव आणि 46 धावांनी जिंकला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने त्या सामन्यात शतकी खेळी केली. 2002 पूर्वी, 1986 मध्ये, टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध या मैदानावर उतरली होती. या सामन्यात भारतीय संघाने 279 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंड आणि भारत यांच्यात 1976 मध्ये खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.

हेडिंग्लेतील 10 सामन्यामधील 5 सामन्यात इंग्लंडचा पराभव

हेडिंग्ले मैदान यजमान संघाला फराचे लकी नाही. या मैदानावर झालेल्या गेल्या 10 सामन्यांपैकी 5 सामन्यात इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2011 मध्ये इंग्लंडने भारतीय संघावर 4-0 असा विजय मिळवला. आणि एक सामना अनिर्णित राहिला.

तिसरा सामना जिंकत विराटला इतिहास रचण्याची संधी

तिसरा कसोटी सामना जिंकून विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी आहे. या दौऱ्याआधी भारताने तीन वेळा इंग्लंडचा दौरा केला आहे. पण भारतीय संघाला इंग्लंडमध्ये याआधी कधीच विजय मिळविता आलेला नाहीत. 2011 मध्ये इंग्लंडने टीम इंडियाला 4-0 ने पराभूत केले होते. यानंतर इंग्लंडने 2014 च्या मालिकेत टीम इंडियाचा 3-1 असा पराभव केला. दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. भारताने 2018 मध्ये शेवटचा इंग्लंडचा दौरा केला होता. या मालिकेतही भारताचा 4-1 असा पराभव झाला.

टीम इंडियाने इंग्लंडच्या भूमीवर 2007 साली कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर भारत राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली तीन कसोटींची मालिका खेळण्यास गेला. पहिला सामना अनिर्णित तर दुसरा सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर तिसरी कसोटीही अनिर्णित राहिली. अशा प्रकारे भारताने ही मालिका 1-0 ने जिंकली होती. त्यामुळे ही मालिका जिंकत विराटच्या भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT