Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

Emerging Teams Asia Cup 2023 Final: पाकिस्तानने टीम इंडियाला दिले 353 धावांचे टार्गेट, तय्यब ताहिरने ठोकले शानदार 'शतक'

Emerging Teams Asia Cup 2023 Final: कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या इमर्जिंग आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारत A आणि पाकिस्तान A संघ आमनेसामने आहेत.

Manish Jadhav

Emerging Teams Asia Cup 2023 Final: कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या इमर्जिंग आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारत A आणि पाकिस्तान A संघ आमनेसामने आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 352 धावा केल्या.

आता भारताला हा सामना जिंकायचा असेल तर निर्धारित 50 षटकांत 353 धावा काढाव्या लागतील. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या षटकापासून आक्रमक सुरुवात केली.

तय्यब ताहिरचे झंझावाती शतक

पाकिस्तानकडून (Pakistan) सलामीवीर सॅम अयुबने 59 आणि शाहिबजादा फरहानने 65 धावा केल्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तय्यब ताहिरने 71 चेंडूत 108 धावांची तूफानी खेळी खेळली. त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. ताहिरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तान संघाने 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारताकडून रियान-हंगारगेकर यांनी 2-2 बळी घेतले

दुसरीकडे, टीम इंडियाकडून (Team India) रियान परागने 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. त्याचबरोबर, हंगारगेकरनेही 6 षटकात 48 धावा देत 2 बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत A (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश धुल (क), रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (वा.), मानव सुथार, हर्षित राणा, आरएस हंगारगेकर, युवराज सिंग डोडिया

पाकिस्तान A (प्लेइंग इलेव्हन): सईम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तैब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर, अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT