India A vs Pakistan A Dainik Gomantak
क्रीडा

India vs Pakistan: आशिया कप फायनलमध्ये भारत - पाकिस्तानची यंगिस्तान भिडणार! कधी अन् कुठे पाहाणार मॅच, जाणून घ्या

Emerging Asia Cup 2023: एमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान संघात 23 जुलैला होणार आहे.

Pranali Kodre

Emerging Asia Cup 2023, India A vs Pakistan A Final: एमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (23 जुलै) भारत अ आणि पाकिस्तान अ संघात रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघात हा सामना होत असल्याने क्रिकेट चाहते उस्तुक आहेत.

दरम्यान, दोन्ही युवा संघांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. भारत अ संघाने उपांत्य सामन्यात बांगलादेश अ संघाला 51 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तसेच पाकिस्तान अ संघाने श्रीलंका अ संघाला उपांत्य सामन्यात 60 धावांनी पराभूत केले आणि अंतिम सामना गाठला आहे.

दोन्ही संघात प्रतिभाशाली युवा खेळाडू आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण वरचढ ठरणार, याकडे अनेक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

भारत अ आणि पाकिस्तान अ संघात या स्पर्धेतील साखळी सामना झाला होता. त्या सामन्यात भारताने 8 विकेट्सने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम सामन्यातही अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल, तर साखळी सामन्यातील चूका सुधारून भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानचा संघ प्रयत्नशील असेल.

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ संघातील अंतिम सामन्याचा तपशील

1. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना किती तारखेला होणार आहे?

  • भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना 23 जुलै रोजी होणार आहे.

2. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना कोठे खेळवला जाईल?

  • भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळवला जाणार आहे.

3. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना किती वाजता खेळवला जाईल?

  • भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.00 वाजता सुरु होईल.

4. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

  • भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता.

5. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

  • भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील अंतिम सामना तुम्ही Fan Code ऍपवर किंवा वेबसाईटवर पाहू शकता.

यातून निवडले जातील 11 जणांचे संघ

  • भारत अ - साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), हर्षित राणा, मानव सुतार, राजवर्धन हंगारगेकर, युवराजसिंग डोडिया, प्रभसिमरन सिंग, आकाश सिंग, नितीश रेड्डी, प्रदोष पॉल.

  • पाकिस्तान अ - सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक/कर्णधार), मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम ज्युनियर, सुफियान मुकीम, अर्शद इक्बाल, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज, कामरान गुलाम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT