'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

romeo lane manager arrest: ऑपरेशनल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेला विजय कुमार सिंग (वय ३८) झारखंडचा मूळ रहिवासी आहे.
Goa nightclub case
Goa nightclub caseDainik Gomantk
Published on
Updated on

Birch by Romeo Lane: हणजूण येथील प्रसिद्ध 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या आगीच्या घटनेनंतर फरार झालेल्या आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मुख्य संशयित गौरव आणि सौरभ लुथरा यांना अटककेल्यानंतर आता पोलिसांनी विजय कुमार सिंग या ऑपरेशनल मॅनेजरला अटक केली आहे.

तपासाची चक्रे फिरली आणि आरोपीचा छडा लागला

'बर्च बाय रोमियो लेन' मध्ये आग लागल्याची घटना घडल्यानंतर, तेथील ऑपरेशनल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेला विजय कुमार सिंग (वय ३८) झारखंडचा मूळ रहिवासी आहे. या अटकेमुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्रात चर्चेत असलेल्या या आगीच्या घटनेला आता नवीन वळण मिळाले आहे. संशयास्पद रित्या गायब झाला होता. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा तो गोव्यात नसल्याचे निष्पन्न झाले.

हणजूण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. त्याचे लोकेशन गोव्याबाहेर, विशेषतः झारखंडमध्ये असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांचे एक विशेष पथक तेथे रवाना झाले. झारखंडमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून विजय कुमारला बेड्या ठोकण्यात आल्या.

मॅनेजरची भूमिका आणि आगीचे कारण

विजय कुमार सिंग हा या आस्थापनेचा ऑपरेशनल मॅनेजर होता, त्यामुळे संपूर्ण व्यवस्थापनाची आणि सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्यावर होती. आगीच्या वेळी नेमकं काय घडलं? सुरक्षिततेच्या मानकांचे उल्लंघन झाले होते का? की ही आग जाणीवपूर्वक लावली गेली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस त्याच्या चौकशीतून शोधणार आहेत. आगीची तीव्रता आणि त्यामुळे झालेले नुकसान पाहता, या प्रकरणातील मॅनेजरची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पोलीस चौकशी

अटकेनंतर विजय कुमारला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हणजूण पोलीस आता त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. "आम्ही या घटनेच्या सर्व बाजू तपासून पाहत आहोत.

आरोपीच्या अटकेनंतर आता आगीमागील नेमकी परिस्थिती आणि त्याची या घटनेतील भूमिका स्पष्ट होईल," असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील इतर काही जणांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com