T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Graeme Smith on India vs SA: टी20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विजयाच्या अगदी जवळ होती, पण भारताने त्यांच्या जबड्यातून विजयाचा घास हिरावून घेतला.
India vs SA
India vs SADainik Gomantak
Published on
Updated on

Graeme Smith On India vs SA: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा रणसंग्राम अर्थात 'आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026' सुरु होण्यास आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारत सध्याचा 'डिफेंडिंग चॅम्पियन' आहे. 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन भारताने 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. मात्र, आता त्या पराभवाच्या आगीत होरपळणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथने भारताला भारतातच हरवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

काय म्हणाला ग्रीम स्मिथ?

टी20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विजयाच्या अगदी जवळ होती, पण भारताने त्यांच्या जबड्यातून विजयाचा घास हिरावून घेतला. तो पराभव दक्षिण आफ्रिकेसाठी आजही वेदनादायी आहे. 'पीटीआय'शी (PTI) बोलताना ग्रीम स्मिथने आपली इच्छा उघडपणे व्यक्त केली.

तो म्हणाला, "मला वाटते की दक्षिण आफ्रिकेने फायनलमध्ये भारताचा (India) पराभव करुन ट्रॉफीवर कब्जा करावा. मात्र हेही लक्षात घेतले पाहिजे की, भारतीय खेळाडूंना कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते. त्यातच यंदाचा वर्ल्ड कप त्यांच्या मायदेशात होत आहे. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये खूप सारे बदल होत आहेत. गौतम गंभीर आणि वरिष्ठ खेळाडू संघाला कसे पुढे नेतात हे पाहणे रंजक ठरेल. जर हा संघ टॉप-4 मध्ये पोहोचला नाही, तर मला खूप आश्चर्य वाटेल."

India vs SA
T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशचा संघ जाहीर; मुस्तफिजुर रहमानला स्थान, 'या' खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा

दक्षिण आफ्रिकेसाठी यशाचा 'मंत्र'

भारतातील खेळपट्ट्यांवर फिरकीचे वर्चस्व पाहायला मिळते हे लक्षात घेऊन स्मिथने आफ्रिकेच्या विजयाचा मार्ग सांगितला. तो म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेची मधली फळी (Middle Order) फिरकी गोलंदाजी खेळण्यात सक्षम आहे. "मला वाटते की भारतात आमच्याकडे मधल्या फळीत स्पिनर्सना खेळण्याची चांगली क्षमता असलेले फलंदाज आहेत. याच कारणामुळे मला आशा आहे की हा वर्ल्ड कप आमच्यासाठी ऐतिहासिक ठरेल," असेही स्मिथने नमूद केले.

India vs SA
Team India Squad T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा; ईशान किशनचं कमबॅक, गिलचा पत्ता कट

भारतीय संघासमोर मोठे आव्हान

टी20 वर्ल्ड कप 2024 च्या जेतेपदानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली तरुण भारतीय संघ विजेतेपद टिकवण्यासाठी मैदानात उतरेल. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा ही भारताची ताकद असली तरी दक्षिण आफ्रिकेसारखे (South Afirca) संघ जुना हिशोब चुकता करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:

एडेन मार्करम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी जॉर्जी, डोनेवन फरेरा, मार्को यानसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, कगिसो रबाडा, जेसन स्मिथ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com