Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

Swiggy Delivery Boy Video: ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण आणि वेळेचे गणित जुळवताना अनेकदा त्यांच्या जिवावर बेतते.
Swiggy Delivery Boy Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Swiggy Delivery Boy Video: ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण आणि वेळेचे गणित जुळवताना अनेकदा त्यांच्या जिवावर बेतते. याचीच प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील अनंतपूर रेल्वे स्थानकावर घडली. धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना स्विगीचा एक डिलिव्हरी पार्टनर प्लॅटफॉर्मवर अत्यंत वाईट पद्धतीने कोसळला. या भीषण अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली असून तिथे उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने हा सर्व थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून 'गिग वर्कर्स'च्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, ही संपूर्ण घटना 'प्रशांती एक्सप्रेस' या ट्रेनमध्ये घडली. ही ट्रेन अनंतपूर स्थानकावर केवळ एक ते दोन मिनिटांच्या अत्यंत कमी वेळेसाठी थांबली होती. याचदरम्यान, ट्रेनमधील एका प्रवाशाने स्विगीवरुन जेवणाची ऑर्डर दिली होती. आपली ड्युटी निभावण्यासाठी आणि प्रवाशाला वेळेत जेवण देण्यासाठी हा डिलिव्हरी बॉय धावतच रेल्वेच्या डब्यात चढला. त्याने प्रवाशाला त्याची ऑर्डर सुपूर्द केली खरी, मात्र तो खाली उतरण्यापूर्वीच ट्रेनने वेग पकडला आणि ती प्लॅटफॉर्म सोडून पुढे जाऊ लागली. हातात इतर अनेक ऑर्डर्स बाकी असल्याने आणि वेळेत पोहोचण्याच्या दबावाखाली असलेल्या या तरुणाने धावत्या ट्रेनमधूनच बाहेर उडी मारण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने उतरताना त्याचा वेग आणि पाय यांच्यातील ताळमेळ बिघडला, त्याने स्वतःचा तोल गमावला आणि तो प्लॅटफॉर्मवर जोरात आदळला.

Swiggy Delivery Boy Video
Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, तो तरुण काही अंतर फरफटत गेला आणि त्याला शरीराच्या अनेक भागांना गंभीर जखमा झाल्या. हा व्हिडिओ पाहणाऱ्या कोणाचेही डोळे पाणावतील. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेक युजर्सनी रेल्वे प्रवाशांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून जर तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किंवा अशा स्थानकावर जेवण मागवत असाल जिथे थांबा कमी आहे, तर स्वतः प्लॅटफॉर्मवर येऊन डिलिव्हरी घेणे ही प्रवाशांची जबाबदारी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. एका डिलिव्हरी बॉयच्या जिवापेक्षा तुमचे जेवण महत्त्वाचे नाही, अशा शब्दांत प्रवाशांना खडे बोल सुनावले जात आहेत.

Swiggy Delivery Boy Video
Viral Video: चहामध्ये केळं अन् आल्यावर सॉस...भन्नाट फूड कॉम्बिनेशनचा व्हिडिओ व्हायरल, पठ्ठ्याची करामत पाहून नेटकरीही हैराण; म्हणाले, "भावा कसं पचवलंस?"

या अपघातामुळे गिग वर्कर्स म्हणजेच या डिलिव्हरी पार्टनर्सच्या कामाच्या पद्धतीवरही मोठी चर्चा सुरु झाली आहे. या तरुणांना वेळेत डिलिव्हरी न केल्यास मिळणारे कमी रेटिंग आणि उत्पन्नावर होणारा परिणाम या भीतीपोटी ते असे जीवघेणे धाडस करतात. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला स्विगी कंपनीकडून योग्य भरपाई आणि उपचारांचा खर्च मिळायला हवा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. केवळ कंपन्यांनीच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने या कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि मानवी मूल्यांसाठी पुढे येणे काळाची गरज बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com