Eight-team development league football tournament in Goa Dainik Gomantak
क्रीडा

गोव्यात आठ संघाची डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धा

पहिले दोन संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रीमियर लीग द नेक्स्ट जन कप स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरतील

दैनिक गोमन्तक

पणजी : देशातील युवा आणि नवोदित फुटबॉलपटूंना ओळख निर्माण करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग (आरएफडीएल) फुटबॉल स्पर्धा उपयुक्त व्यासपीठ असेल. या स्पर्धेस शुक्रवारपासून (ता. 15) गोव्यात सुरवात होईल.

स्पर्धेतील सामने एकेरी साखळी फेरी पद्धतीने 12 मेपर्यंत दक्षिण गोव्यातील नागोवा व बाणावली येथील मैदानावर खेळले जातील. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील चेन्नईयीन एफसी, एफसी गोवा, बंगळूर एफसी, केरळा ब्लास्टर्स, हैदराबाद एफसी, मुंबई सिटी एफसी, जमशेदपूर एफसी हे सात संघ, तसेच रिलायन्स फाऊंडेशन (आरएफ) यंग चॅँप्स मिळून आठ संघ खेळतील. यापैकी पहिले दोन संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रीमियर लीग द नेक्स्ट जन कप स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरतील.

स्पर्धेतील पहिली लढत शुक्रवारी नागोवा येथील मैदानावर चेन्नईयीन एफसी व एफसी गोवा यांच्यात होईल. संध्याकाळच्या सत्रात बंगळूर व यंग चँप्स यांच्यात लढत होईल. शनिवारी (ता. 16) केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) व हैदराबाद यांच्यात नागोवा येथे, तर मुंबई सिटी व जमशेदपूर यांच्यात बाणावली येथे सामना होईल.

यंग चँप्स `पंचतारांकित` अकादमी आरएफ यंग चँप्स ही देशातील एकमेव पंचतारांकित फुटबॉल अकादमी आहे. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू (football) अराटा इझुमी या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ``डेव्हलपमेंट लीगमुळे युवा खेळाडूंना गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होत आहे,`` असे इझुमी यांनी स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सांगितले. यंग चँप्स संघातील खेळाडू पाच वर्षांपासून अकादमीत आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी ते या अकादमीत दाखल झाले होते. खेळाडूंचा वैयक्तिक विकास हेच आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे, असे नमूद करत इझुमी म्हणाले, की इतर क्लबना गुणवत्ता पाहता येईल आणि खेळाडूंना व्यावसायिक फुटबॉलमध्ये करार मिळण्याची आशा बाळगता येईल. भारतातील भविष्यकालीन फुटबॉल गुणवत्ता विकसित करत राहणे हेच आरएफ यंग चँप्स अकादमीचे धोरण आहे.

आयएसएलमधील खेळाडू खेळणार 2021-22 मोसमातील आयएसएल स्पर्धेत खेळलेले खेळाडू आपापल्या क्लबतर्फे डेव्हलपमेंट लीगमध्ये खेळतील. यामध्ये आयएसएल उपविजेत्या केरळा ब्लास्टर्सचे संजीव स्टॅलिन, व्ही. बिजॉय, आयुष अधिकारी, व्हिन्सी बार्रेटो, लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या जमशेदपूर एफसीचे संदीप मंडी, विशाल यादव, मोहितसिंग धामी या खेळाडूंचा समावेश आहे. एफसी गोवा डेव्हलपमेंट संघातील ह्रतीक तिवारी, ब्रायसन फर्नांडिस व डॅन्स्टन फर्नांडिस यावेळच्या आयएसएल संघात होते.

डेव्हलपमेंट लीग स्पर्धेविषयी - एकूण 8 संघ, त्यापैकी 7 संघ आयएसएल स्पर्धेतील - 1 जानेवारी 2001 रोजी किंवा नंतर जन्मलेले खेळाडू स्पर्धेसाठी पात्र - प्रत्येक संघात 23 वर्षांखालील (1 जानेवारी 1999 रोजी किंवा नंतर जन्म) 5 खेळाडू निवडता येतील - अंतिम 11 सदस्यीय संघात 23 वर्षांखालील 3 खेळाडू खेळू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT