ECB New Rules Dainik Gomantak
क्रीडा

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

ECB New Rules for Cricketers: इंग्लंड क्रिकेट संघातील काही खेळाडूंच्या मैदानाबाहेरील वादग्रस्त घटनांनंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) शिस्तीबाबत कठोर भूमिका घेतली आहे.

Sameer Amunekar

इंग्लंड क्रिकेट संघातील काही खेळाडूंच्या मैदानाबाहेरील वादग्रस्त घटनांनंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) शिस्तीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मद्यपान, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन आणि सोशल मीडियावरील वर्तन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्डाने सहा महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

खेळाडूंसाठी कोणते आहेत नवे नियम?

ECB ने जारी केलेल्या नव्या आचारसंहितेनुसार सामन्याच्या आदल्या दिवसापासून ते सामना संपल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापर्यंत खेळाडूंना मद्यपान करण्यास परवानगी नसेल. मालिका किंवा सामन्यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासाठी टीम व्यवस्थापनाची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.

याशिवाय देशांतर्गत मालिका आणि परदेश दौऱ्यांदरम्यान रात्री 12 नंतर कर्फ्यू लागू असेल. खेळाडूंना रात्री 10 नंतर टीम व्यवस्थापनाला माहिती न देता बाहेर राहता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत दिसणे किंवा मद्याशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणेही नियमभंग मानला जाणार आहे.

पूर्वीच्या घटनांमुळे घेतला निर्णय

गेल्या काही वर्षांत इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंची नावे मद्यपान आणि गैरवर्तनाशी संबंधित घटनांमध्ये समोर आली होती. बेन स्टोक्स यांच्याशी संबंधित वाद, हॅरी ब्रूक, गस अॅटकिन्सन आणि बेन डकेट यांच्या कथित गैरवर्तनाच्या घटनांमुळे संघाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंमध्ये अधिक शिस्त निर्माण करण्यासाठी ECB ने हे नियम लागू केल्याचे मानले जात आहे.

शिस्तीसोबत कामगिरीवरही भर

मैदानाबाहेरील शिस्तीवर भर दिला जात असतानाच इंग्लंडचा संघ सध्या मैदानावरही दमदार कामगिरी करत आहे. अलीकडील टी-20 मालिकेत इंग्लंडने भारताविरुद्ध सलग विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. त्यामुळे संघाची प्रतिमा आणि व्यावसायिकता अधिक मजबूत करण्यासाठी ECB आता मैदानावरील प्रदर्शनासोबतच खेळाडूंच्या वर्तनालाही तितकेच महत्त्व देत आहे.

नियमांचे पालन महत्त्वाचे

नव्या नियमांमुळे इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये अधिक शिस्तबद्ध वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खेळाडूंनी या आचारसंहितेचे कितपत पालन केले आणि त्याचा संघाच्या संस्कृतीवर काय परिणाम झाला, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT