Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

arjun tendulkar goa cricket: देशांतर्गत क्रिकेटमधील आगामी मोसमात गोव्यातर्फे गतवेळचे ‘पाहुणे’ ललित यादव व वासुकी कौशिक पुन्हा एकदा खेळण्याची निश्चित आहे.
arjun tendulkar goa cricket
Arjun TendulakrDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: देशांतर्गत क्रिकेटमधील आगामी मोसमात गोव्यातर्फे गतवेळचे ‘पाहुणे’ ललित यादव व वासुकी कौशिक पुन्हा एकदा खेळण्याची निश्चित आहे, मात्र महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सलग पाचवा मोसम खेळणार, की गोवा क्रिकेट संघटना (जीसीए) नवा ‘पाहुणा’ क्रिकेटपटू शोधणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी संघटनेत सध्या विचारमंथन सुरू आहे.

अर्जुन तेंडुलकर २०२६-२७ मोसमात गोव्याकडून (Goa) खेळण्याबाबत अजून अधिकृत निर्णय झालेला नाही, त्यामुळे काही दिवस निश्चितच थांबावे लागेल, असे जीसीएच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘गोमन्तक’ला गुरुवारी सांगितले. नव्या मोसमात मे-जूनमध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या गोल्ड कप क्रिकेट स्पर्धेत गतमोसमातील पाहुणे क्रिकेटपटू ललित यादव व वासुकी कौशिक गोव्याकडून खेळले होते.

२६ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज आणि तळातील फलंदाज असलेला अर्जुन २०२२-२३ पासून गोव्यातर्फे पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने रणजी करंडक, विजय हजारे करंडक (एकदिवसीय) व सय्यद मुश्ताक अली करंडक (टी-२०) स्पर्धेत खेळत आहे. गोव्याकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याने २४ सामन्यांत ५२ गडी बाद केले आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये गोव्यातर्फे रणजी पदार्पणात अर्जुनने ‘नाईट वॉचमन’ या नात्याने फलंदाजीस येत शानदार शतकी खेळी केली होती. कारकिर्दीच्या सुरवातीस अर्जुन एकदिवसीय व टी-२० स्पर्धेत मुंबईकडून खेळला होता. २०२६ मधील आयपीएल स्पर्धेत अर्जुन लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळला होता.

arjun tendulkar goa cricket
Arjun Tendulkar: 4 सामन्यांत 0 विकेट! अर्जुन तेंडुलकरमुळे वाढले गोव्याचे टेन्शन; महागडी गोलंदाजी ठरतेय डोकेदुखी

जून महिन्यात झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या टी-२० लीग स्पर्धेत अर्जुन खेळला होता. तो ‘जीसीए’च्या स्थानिक प्रीमियर लीग, एकदिवसीय करंडक, तसेच टी-२० करंडक स्पर्धेत खेळलेला नाही. या कारणास्तव एका वर्षाचा ‘कुलिंग’ नियम अर्जुनला लागू होत नसल्याने तो मुंबई टी-२० लीगमध्ये खेळू शकतो, असे कारण तेव्हा देण्यात आले होते.

arjun tendulkar goa cricket
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा जलवा! IPLसाठी ठोठावले दरवाजे; गोव्यासाठी सलामीला फलंदाजी; गोलंदाजीतही कमाल

शोधावा लागेल दमदार खेळाडू

अर्जुन तेंडुलकरला गोवा क्रिकेट असोसिएशनने पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने मुक्त केल्यास आगामी मोसमासाठी त्याच्याजागी नवा दमदार खेळाडू संघटनेला शोधावा लागेल. या पार्श्वभूमीवर जीसीएने काही पाहुण्या क्रिकेटपटूंच्या नावाची चाचपणी केली आहे, अशी माहिती जीसीएतील सूत्राने दिली.

arjun tendulkar goa cricket
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर गोवा सोडणार? रणजीच्या संभाव्य यादीत नाही केला समावेश

गतमोसमातील रणजी स्पर्धेत गोव्याचे पाहुणे

दिल्लीच्या ललित यादव याच्या सात सामन्यांत एका द्विशतकासह ५१.२०च्या सरासरीने ५१२ धावा, तसेच ऑफ स्पिन गोलंदाजीत ३१.८२च्या सरासरीने १७ गडी बाद

कर्नाटकाच्या मध्यमगती वासुकी कौशिक याने सहा रणजी सामन्यांत २५.१ च्या सरासरीने १५ गडी टिपताना एकवेळ डावात पाच गडी बाद

अर्जुन तेंडुलकरचे सात सामन्यात ४९.२०च्या सरासरीने १५ गडी बाद, तर १५.३०च्या सरासरीने १५३ धावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Avani Sawant Cricket Performance
Goa Ranji Trophy
Arjun Rampal marries Gabriella Demetriades
Arjun Tendulkar Continue Playing For Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com